महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे अर्धवट राहिलेल्या घराचे स्वप्न पूर्ण; मंत्री एकनाथ शिंदेंनी केले घराचे भूमीपूजन - कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर घर

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमीपूजन पार पडले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हीसीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील, असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मंत्री एकनाथ शिंदे
मंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jan 23, 2022, 8:10 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे अर्धवट राहिलेल्या घराचे स्वप्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमीपूजन पार पडले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हीसीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील, असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरे वाटावे, तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी बीड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी पायी चालायला सुरुवात देखील केली. मात्र रस्त्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. २६ डिसेंबर रोजी कर्नाटकमधील रायचूर येथे उपचारादरम्यान त्यांचा दुःखद अंत झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे संपूर्ण कुटुंब निराधार झाले होते. या अवघड परिस्थितीत या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला. सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर यांनी मंत्री शिंदे यांचे आभार मानले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details