महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंच्या याचिकेवर 8 मार्चला सुनावणी - एकनाथ खडसे लेटेस्ट न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना 8 मार्चपर्यंत मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे, आजची बुधवारची सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम राहिला आहे. भोसरी जमीन प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंनी याचिका दाखल केलेली आहे.

Bhosari plot scam case
खडसेंच्या याचिकेवर 8 मार्चला सुनावणी

By

Published : Feb 24, 2021, 5:49 PM IST

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना 8 मार्चपर्यंत मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे, आजची बुधवारची सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम राहिला आहे. भोसरी जमीन प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंनी याचिका दाखल केलेली आहे.

एकनाथ खडसे यांनी जानेवारीमध्ये उच्च न्यायालयात धाव घेत, अंमलबजावणी संचालनालयाने जारी केलेले समन्स रद्द करण्याची विनंती केली होती. दरम्यान यावर बुधवारी सुनावणी होती. मात्र काही कारणामुळे खडसेंच्या याचिकेवरील सुनावणी आज होऊ शकली नाही, आता या याचिकेवर येत्या 8 मार्चला सुणावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भोसरी भूखंड घोट्याळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले होते, याविरोधात खडसे यांनी समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. खडसे यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी बुधवारी सांगितले की, या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनाणवी होणार होती, मात्र काही कारणामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 8 मार्चला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details