मुंबई -महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून वाद ( Bhonga vs Hanuman Chalisa Controversy ) सुरू झाल्यानंतर राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Maharashtra Navnirman Sena ) महाविकास आघाडी सरकारच्या काळात चर्चेत होते. महाराष्ट्रात सत्ता बदल झाली आणि हा वाद काहीसा मागे पडत गेला. मात्र, आता पुन्हा भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, मनसेने माहीम परिसरात पुन्हा एकदा भोंगे लावून अजान दिली जात असल्याची तक्रार माहीम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
भोंगे पुन्हा सुरू कारवाई करा :यासंदर्भात माहिती देताना मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार सांगतात की, मशिदींवरील भोंग्यांविरोधात आम्ही आवाज उठवल्या नंतर माहिम परिसरांतील सर्वच मशिंदीमध्ये काही काळ बिना लॉऊड स्पिकर्स अजान होत होती. परंतु आता पुन्हा आजनच्या वेळेस सर्रास लॉऊड स्पिकर्सचा वापर होताना दिसतो आहे आणि तशा प्रकारच्या तक्रारी देखील आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे या प्रकरणी माहिम विभागातील मर्शिदिंवरील भोंग्यावरून पुन्हा सुरू झालेल्या अजानवर आपण कायदेशीर मार्गाने कारवाई करून लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी विनंती आम्ही पोलिसांना केली आहे.