महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्य सरकार हुकूमशहा सारखं वागतंय, भोंगा चित्रपट थिएटरमधून काढण्यास सांगितले! - अमेय खोपकर - Bhonga movie

राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ‘भोंगा’च्या प्रदर्शनावरून राजकीय नाट्य घडताना दिसतंय. ‘भोंगा’ ३ मे २०२२ ला प्रदर्शित झाला आहे. मात्र मुंबई, पुणे, सातारा मधील काही चित्रपटगृहांमध्ये या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटावर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली असल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

Bhonga movie is being taken out of the theater due to politics - Ameya Khopkar
राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ‘भोंगा’

By

Published : May 5, 2022, 1:19 PM IST

मुंबई- राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ‘भोंगा’च्या प्रदर्शनावरून राजकीय नाट्य घडताना दिसतंय. ‘भोंगा’ ३ मे २०२२ ला प्रदर्शित झाला आहे. मात्र मुंबई, पुणे, सातारा मधील काही चित्रपटगृहांमध्ये या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटावर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली असल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अमेय खोपकर यांच्या म्हणण्यानुसार राज्यसरकार हुकूमशहा सारखं वागतंय. त्यांनी ट्विट केलाय की, 'जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेला आहे, तो भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावणे हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं? राज्य सरकार हुकूमशहा सारखं वागतंय, भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावताहेत. पोलिसांना बेकायदेशीर काम करायला स्वतः गृहखातं सांगतय.'

मराठी चित्रपटांची गळचेपी होईल- आपापल्या देवाची प्रार्थना करणं धर्माचं काम आहे, मान्य आहे, पण त्यासाठी भोंगाच वापरायला पाहिजे असं कुठे लिहिले आहे, हा प्रश्न ‘भोंगा’ या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. परंतु या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अमेय खोपकर म्हणताहेत की राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सामजिक विषय हाताळणाऱ्या 'भोंगा' चित्रपटाला राजकीय कलाटणी मिळत असून हा चित्रपट चित्रपटगृहात न लावण्यास पोलीस अधिकाऱ्यांकडून थिएटर मालकांना फोन कॉल्स जात आहेत, असा आरोप निर्मात्यांनी केला आहे. तसेच निर्माते अमोल कागणे म्हणाले की, 'मराठी चित्रपटांना राज्य सरकार आणि पोलिसांनी सहकार्य न केल्यास, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट महाराष्ट्रात मराठी चित्रपटांवर राज्य करताना दिसतील, परिणामी मराठी चित्रपटांची अजूनच गळचेपी होईल.'चित्रपटाचे निर्माते अमोल लक्ष्मण कागणे यांनी या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत म्हटले की, 'सामाजिक विषय हाताळणाऱ्या कथेला राजकीय स्वरूप देणे हे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अशा चित्रपटाचा हा अपमान आहे, असं मला वाटतं. मराठी चित्रपटांना थिएटर मिळणे, प्राईम टाईम मिळणं ही सर्वात मोठी बोंब असून मराठी चित्रपट निर्माता स्वतःचे १००% देऊन चित्रपट निर्मिती करतो. जर सरकारने किंवा पोलीसांनी महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना सहकार्य नाही केलं तर मराठी माणूस कुठे दाद मागणार? मराठी चित्रपटांना सपोर्ट नाही केला तर मराठी भाषा टिकणार नाही, असे मला वाटते. मराठी चित्रपटाचं मार्केट आणि अस्तित्व बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी खाऊन टाकायला वेळ नाही लागणार.'राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'भोंगा' या चित्रपटाची निर्मिती चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संदीप देशपांडे आणि अर्जुन हिरामण महाजन, अमोल लक्ष्मण कागणे शिवाजी लोटन पाटील यांनी केली असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details