महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वर्नन गोन्साल्विस यांची वैद्यकीय जामिनाची याचिका मागे - गोन्साल्विस यांची वैद्यकीय जामिनाची याचिका मागे

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी (Bhima Koregaon case) वर्नन गोन्साल्विस यांनी आज शुक्रवारी दि. 16 रोजी वैद्यकीय कारणास्तव तात्पुरत्या जामिनासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेतली आहे (Vernon Gonsalves medical bail plea withdrawn). वर्नन गोन्साल्विस यांना काही दिवसांपूर्वी तळोजा कारागृहात असताना डेंगू झाल्यानंतर त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वर्नन गोन्साल्विस
वर्नन गोन्साल्विस

By

Published : Sep 16, 2022, 10:01 PM IST

मुंबई -भीमा कोरेगाव आणि (Bhima Koregaon case) एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वर्नन गोन्साल्विस यांनी आज शुक्रवारी दि. 16 रोजी वैद्यकीय कारणास्तव तात्पुरत्या जामिनासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेतली आहे (Vernon Gonsalves medical bail plea withdrawn). वर्नन गोन्साल्विस यांना काही दिवसांपूर्वी तळोजा कारागृहात असताना डेंगू झाल्यानंतर त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणावर पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.


आरोपी वर्नन गोन्साल्विस यांच्या वकिलाने असे सांगितले की आरोपीला सरकारी जे जे रुग्णालयात आवश्यक उपचार दिले जात असल्याने याचिका मागे घेण्यात येत आहे. एल्गार-परिषद प्रकरणात त्यांच्या भूमिकेसाठी अटक करण्यात आलेल्या गोन्साल्विस यांना नवी मुंबईच्या शेजारील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. 8 सप्टेंबरपासून त्यांना डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अर्ज मागे घेण्यापूर्वी गोन्साल्विस यांच्या पत्नी वकिल सुसान अब्राहम यांनी विशेष न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले होते की त्यांना पुन्हा तुरुंगात पाठविल्यास तेथे औषधोपचार न मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीला धोका असल्याचे कार्यकर्त्याला वाटते आहे.


वर्नन गोन्साल्विसना वाटत आहे की तुरुंग अधिकारी रुग्णालयातून वेळेपूर्वी डिस्चार्जसाठी दबाव आणू शकतात. कोर्टाने हे निश्चित केले पाहिजे की ते डिस्चार्ज होण्याआधी त्यांना तळोजा सेंट्रल जेलच्या जीवघेण्या परिस्थितीत पाठवले जाणार नाही असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.


दरम्यान या प्रकरणातील आणखी दोन कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे आणि सागर गोरखे यांनी कारागृहात मच्छरदाणी मिळावी यासाठी न्यायालयासमोर याचिका दाखल केली आहे. तेलतुंबडे यांच्या याचिकेत म्हटले आहे की सहआरोपींच्या या अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने आवश्यक निर्देश देऊनही तळोजा कारागृहाच्या स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

कारागृह डासांनी भरलेलेआहे. मच्छर प्रतिबंधक मलम आणि डासांच्या अगरबत्तीचा फारसा उपयोग होत नाही. मलम वापरूनही डास चावण्याचा त्रास होत आहे. त्यांची वैद्यकीय स्थिती पाहता मलेरिया किंवा डेंग्यू होण्याची शक्यता जास्त आहे असेही नमूद करण्यात आले आहे.


नेमके प्रकरण काय आहे - मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती. त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होता. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्ये त्यास कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.

या एल्गार परिषदेच्यामागे माओवादी संघटनांचा हात होता असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत, या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details