मुंबईभीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातीलBhima Koregaon and Elgar Parishad आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातील Special NIA Court विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला Gautam Navalkhas bail application rejected होता. या संदर्भातील सविस्तर निकाल प्राप्त झाला. विशेष न्यायालयाने असे म्हटले आहे की, नवलखा यांच्या या प्रकरणांमध्ये प्रथम दर्शनीय पुरावांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे. गुन्ह्याचे गंभीर्य लक्षात घेता त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, अर्जदाराच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे या प्रकरणाशी अर्जदाराचा संबंध दर्शवितात. असे नमूद करून आरोपपत्राचे अवलोकन केल्यावर त्याच्याविरुद्ध भरपूर साहित्य आहे. प्रामुख्याने अर्जदाराचा या कथित गुन्ह्याशी संबंध असल्याचे दिसते, असे म्हणत न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याची टिप्पणी Elgar Parishad Accused Gautam Navlakha केली.
गौतम नवलखाकडे तपासादरम्यान भारतीय कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित कागदपत्रे आढळली खटल्याच्या गुणवत्तेनुसार 69 वर्षीय व्यक्तीची ही पहिली जामीन याचिका होती. आदेशात राष्ट्रीय तपास संस्था कायद्यांतर्गत नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश राजेश जे. कटारिया यांनी नमूद केले की, गुन्ह्यात नवलखा यांचा संबंध असल्याचा विशेष आरोप आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, तपासादरम्यान त्याच्याकडे भारतीय कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित दोषी कागदपत्रे आढळून आली होती. एनआयएने नवलखा यांच्यावरील आरोपांचा उल्लेख करून पुढे म्हटले आहे की, नवलखा यांनी काश्मीर फुटीरतावादी चळवळ आणि माओवाद्यांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाषणे दिली आणि त्यांनी त्याचे समर्थन केले असा आरोप आहे.