मुंबई - साकीनाका येथील पिडीत प्रकरणात 'अॅट्रॉसिटी'अन्वये गुन्हा दाखल करावा. तीच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक सहाय्य करावे. तसेच, शासनाची सदनिका द्यावी यासह गुन्ह्यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशा मागण्यांसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने साकीनाका पोलीस ठाणे येथे जोरदार निदर्शने केली.
पोलीसांनी पीडितेच्या कुटुंबियांना घेऊन कालच घाईघाईने अंत्यसंस्कार उरकले. यावर भीम आर्मीने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी पोलीस ठाणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भीम आर्मीच्या मुख्य मागण्या
महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेला शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा.
साकीनाका प्रकरणातील ईतर आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन सर्व आरोपींविरोधात 307, 376 भादंवि कलमांसह 302 व अॅट्राॅसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा.