मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मागासवर्गीयांवर होणारा अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा जाब विचारल्यास खोट्या तक्रारी दाखल करुन तुरुंगात बंद करण्याचा संविधान विरोधी कट चालला आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे. यापुढे मागासवर्गीय समाजाला स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मागास वर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार अन्याय होत आहेत. नागपूरमध्ये अनिल बनसोड आणि पुण्यामध्ये विराज जगताप यांची हत्या करण्यात आली. हिंगोलीमध्ये मागासवर्गीय कुटुंबियांवर दीडशे लोक धावून जातात. हे सर्व घडत असताना महाराष्ट्र सरकार न्याय देत नाही. त्यामुळे आपल्यालाच आपले संरक्षण करावे लागेल, असेही अशोक कांबळे यांनी म्हटले आहे.