मुंबई-मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांना ( 10 नोव्हेंबर ) रोजी अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र आल्यानंतर महापौरांकडून भायखळाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भायखळा पोलिसांनी या प्रकरणी विजेंद्र म्हात्रे याच्यावर गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारयांच्यावर मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या शासकीय निवासस्थानी धमकीचे पत्र मिळाले होते. त्यामध्ये दादाला त्रास दिल्यास वाईट परिणाम होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती भायखळाला पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा-Ashish Shelar on Police case: जितका आवाज दाबला जाईल तितक्याच ताकदीने समोर येऊ - आशिष शेलार
पत्रावर रायगड आणि मुंबईचा पत्ता
महापूर किशोरी पेडणेकर यांना मिळाल्या पत्रावर दोन पत्ते आहेत. पत्राच्या आतील भागांमध्ये उरण रायगड श्री माळी कॉम्प्लेक्स ऊरा रोड उरण रायगड असा पत्ता आहे. तर पत्राच्यावरील भागावर पालघर नवी मुंबई येथील पत्ता आहे. यासंदर्भात भायखळा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र त्या ठिकाणी विजेंद्र मात्रे नावाचे कोणीही व्यक्ती राहत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.