मुंबई - भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर मदत करण्याच्या बहाण्याने सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या अत्याचाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस दर्जाच्या महिला पोलील अधिकाऱ्याची नेमणूक करावी. त्यांच्या नेतृत्वाखाली एसआटीमार्फत फास्ट ट्रॅकवर तपास करावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ( eknath shinde order fast track procedure bhandara rape case ) आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, भंडाऱ्यातील प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर करुन आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे, तसेच यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही, असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पिडीत महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कोणत्याही प्रकारची हयगय यामध्ये होणार नाही, हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात झाले पहिले अत्याचार - ही महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पतीने सोडून दिल्याने पीडिता तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. पायी जात असतांना एका नराधमाने मदतीच्या बहाण्याने आपल्या चारचाकी मध्ये बसविले आणि त्यानंतर तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले.