महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bhai Jagtap On Pravin Darekar : प्रवीण दरेकर यांची ईडी व आयकर विभागाकडून चौकशी करावी - भाई जगताप

सहकार विभागाने प्रवीण दरेकरांनी केलेल्या २००० कोटींच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे पोलिसांना सुपूर्द केलेली आहेत. त्याच्या आधारावर प्रवीण दरेकर यांची चौकशी करून सहकार विभागातर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाई जगताप यांनी राज्य सरकारकडे केली ( Bhai Jagtap On Pravin Darekar ) आहे. दरेकर यांची ED व आयकर विभागाकडून चौकशी करावी अशी मागणीही जगताप यांनी ( Bhai Jagtap Demand to Ed and it Inquiry ) केली आहे.

Bhai Jagtap On Pravin Darekar
भाई जगताप

By

Published : Apr 4, 2022, 6:58 PM IST

मुंबई- सहकार विभागाने प्रवीण दरेकरांनी केलेल्या २००० कोटींच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे पोलिसांना सुपूर्द केलेली आहेत. त्याच्या आधारावर प्रवीण दरेकर यांची चौकशी करून सहकार विभागातर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाई जगताप ( Bhai Jagtap On Pravin Darekar ) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच दरेकर यांच्यात हिम्मत असेल तर माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू दाखवावा असे खुले आवाहन भाई जगताप यांनी दरेकर यांना दिले आहे. दरेकर यांची ED व आयकर विभागाकडून चौकशी करावी अशी मागणीही जगताप यांनी ( Bhai Jagtap Demand to Ed and it Inquiry ) केली आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयात जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकून दाखवा -गेली २० वर्षी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मजूर असल्याचा खोटा बनाव करून मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून येणारे आणि मुंबै बँकेमध्ये २००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आज आपला भ्रष्टाचार, आपले पितळ संपूर्ण जगासमोर उघडे पडल्यावर साव पणाचा आव आणून ट्विटरच्या माध्यमातून आमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा करत आहेत. त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकून दाखवावा, असे खुले आव्हान भाई जगताप यांनी प्रवीण दरेकरांना केले आहे.

सहकार विभागातर्फे कायदेशीर कारवाई करा -भाई जगताप पुढे म्हणाले की, हा सर्व भ्रष्टाचार प्रवीण दरेकरांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना केलेला होता. त्यावेळेस या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन कायदेशीर रित्या त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण त्यावेळेस असेलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकरांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना क्लीन चिट दिली. आज ही ज्या गुन्ह्याखाली महाराष्ट्र सरकार प्रवीण दरेकरांवर कारवाई करत आहे, ती त्यांनी मुंबई बँकेत बनावट मजूर (रंगारी) असल्याचे कागदोपत्री दाखवले होते त्याबद्दल कारवाई होत आहे. प्रवीण दरेकर यांनी २००० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. त्या संबंधीची सर्व कागदपत्रे सहकार विभागाच्या ऑडिटर्सने पोलिसांकडे सुपूर्द केलेली आहेत. या कागदपत्रांच्या आधारावर प्रवीण दरेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचाही दुसरा एक गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांची याबद्दल सखोल चौकशी करून त्यांच्यावर या गुन्ह्याअंतर्गत सहकार विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जगताप यांनी केली.

ED व आयकर विभागाकडून चौकशी करा -राज्यामध्ये आणि देशामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकार ED व आयकर विभागामार्फत नोटीस पाठवत आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मग आज मुंबई बँकेमध्ये प्रवीण दरेकरांनी २००० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे सहकार विभागाने सुपूर्द केलेल्या कागदपत्रांमार्फत स्पष्टपणे उघड उघड दिसत आहे. मग हे धडधडीत सत्य समोर दिसत असताना देखील प्रवीण दरेकरांवर ED व आयकर विभागामार्फत कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न जगताप यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. प्रवीण दरेकर यांनी केलेला २,००० कोटींचा भ्रष्टाचार हा गंभीर गुन्हा आहे. त्यांची ED व आयकर विभागाकडून सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीचे पत्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देणार आहोत, असे भाई जगताप म्हणाले.

हेही वाचा -Alternative Fuel Council Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पुण्यातील पर्यायी इंधन परिषदेचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details