महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देवेंद्र फडणवीस आरक्षणविरोधी, डुप्लिकेट माणूस; भाई जगताप यांचा आरोप

देवेंद्र फडणवीस नसून ते फसवणीस आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला.

mumbai politics
भाई जगताप आणि देवेंद्र फडणवीस संग्रहित फोटो

By

Published : Jun 28, 2021, 4:58 PM IST

Updated : Jun 28, 2021, 5:16 PM IST

मुंबई - देवेंद्र फडणवीस हे आरक्षणविरोधी होते. त्यांच्यासारखा डुप्लिकेट माणूस बघितला नाही. देवेंद्र फडणवीस नसून ते फसवणीस आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. ओबीसी आरक्षणाबाबत फायलींवर सही करताना फडणवीस यांचा हात का थांबला नाही? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत फडणवीस यांनी भाजपच्या ८२ जागा वाचवून दाखवाव्यात, असे आव्हान जगताप यांनी दिले.

प्रतिक्रिया देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप
  • भाजपचा भ्रम चुकीचा -

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या उपस्थित महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना, मागील वेळी राज्यात भाजपचे सरकार असताना चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली. याचा फायदा भाजपाला झाला. ३२ नगरसेवक असलेल्या भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले. ज्या प्रकारे वार्डची रचना गेली ती चुकीची होती याचा फायदा भाजपाला झाला होता. भाजपच्या कामांमुळे जागा वाढल्या असा भ्रम असेल तर तो चुकीचा आहे, असा टोला जगताप यांनी लगावला.

हेही वाचा -पुण्यात कडक निर्बंध, दुपारी ४ नंतर ही दुकाने बंद, जाणून घ्या नवीन नियमावली

  • ४५ वार्डची पुनर्र्चना चुकीच्या पद्धतीने -

वार्डची पुनर्रचना हा कळीचा मुद्दा कायम आहे. याआधीही वॉर्डच्या पुनर्रचना झाल्या आहेत. मात्र भाजपा सरकराने वार्ड रचना केली ही योग्य नाही हे कायम आम्ही बोलत आलो आहोत. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पात्राला उत्तर आले आहे. निवडणूक आयोग प्रभाग रचना पुन्हा करणार आहे. निवडणूक आयोगाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर दिले आहे. आता सर्व वार्डची पुनर्र्चना रचना होणे शक्य नाही हे आम्हाला माहीत आहे. मात्र जवळपास ४५ वार्डची पुनर्र्चना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. वॉर्ड रचना चुकीच्या पद्धतीने केली आहे हे आम्ही सिद्ध देखील करू, असे जगताप म्हणाले.

  • हरकती व सूचना -

मुंबई महापालिकेची २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीपूर्वी २०१६ मध्ये प्रभाग रचना बदलण्यात आली. याचा फायदा भाजपला झाल्याची चर्चा आहे. २०१२ मध्ये ३२ जागा असलेल्या भाजपाला २०१७ मध्ये ८२ जागा मिळाल्या. भाजपाला ५० जागांचा फायदा झाला. येत्या निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे. पालिकेतील काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. रवी राजा यांच्या मागणीला भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी विरोध केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचने बाबत प्रारूप पुनर्रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणार आहे.

हेही वाचा -आयपीएस परमबीर सिंह दोन महिन्यांच्या सुट्टीवर; ५ मे पासून पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे

Last Updated : Jun 28, 2021, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details