महाराष्ट्र

maharashtra

शनिवारपासून मुंबई काँग्रेसचा 100 दिवस 100 वार्ड कार्यक्रम

By

Published : Jan 14, 2021, 7:10 PM IST

Updated : Jan 14, 2021, 7:18 PM IST

मुंबईत असलेल्या 228 वार्डांमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढण्यासाठीची रणनीती या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.

bhai jagtap
bhai jagtap

मुंबई - महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन मुंबई प्रदेश काँग्रेसने शनिवारी 16 जानेवारीपासून पुढील शंभर दिवस मुंबईतील 100 वार्डांमध्ये पदयात्रा आणि विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. या माध्यमातून मुंबईत असलेल्या 228 वार्डांमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढण्यासाठीची रणनीती या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.

शिव कोळीवाडा येथून सुरुवात

शनिवारी 16 तारखेला आमच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात शिव कोळीवाडा येथून होईल. पहिल्या टप्प्यात आम्ही महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांच्या वार्डमधून पदयात्रा आदी कार्यक्रम घेणार असून त्यानंतर आमचे नगरसेवक आहेत त्याठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत. महापालिकेत आमचे 28 नगरसेवक आहेत, पण आम्ही 100 वार्डांमध्ये आमचे हे अभियान सुरू केले जाणार आहे. त्यानंतर त्याची मर्यादा वाढवली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर लवकरच मुंबईकरांसाठी जनता दरबार भरवला जाणार आहे. त्यात सहा ठिकाणी काँग्रेसचे दोन-दोन मंत्री जातील. त्या ठिकाणी हा जनता दरबार भरवला जाईल, अशी माहितीही जगताप यांनी दिली.

विविध मागण्या

मुंबईकरांचा प्रॉपर्टी टॅक्स हा 2025पर्यंत माफ केला जावा, जो टॅक्स माफ करण्याचा निर्णय विधान मंडळात घेण्यात आला, तो माफ व्हावा तसेच गृहनिर्माण संस्थांना देण्यात येणाऱ्या डीम्ड कन्व्हेअन्समध्ये ज्यांना काही बिल्डर कागदपत्रे देत नाहीत, अशा नागरिकांना यात दिलासा देण्यात यावा. त्यांची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन केली जावी आणि त्यासोबत 30 वर्षांपासून असलेल्या सोसायट्यांना ओसी आणि इतर कागदपत्रे नाहीत, अशा संस्थांना 15 जानेवारीपर्यंत यासाठी कागदपत्रे जमा करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यांना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या.

'मोफत पाणीपुरवठा व्हावा'

आपण मागील काही दिवसांपासून मुंबईतील झोपडपट्टी धारकांना मोफत पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी करत असून ती यापुढेही लावून धरली जाईल, असेही जगताप यांनी सांगितले.

Last Updated : Jan 14, 2021, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details