महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

LIVE :'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेसाठी लाचार', अशिष शेलारांची सरकारवर टीका

uddhav thackeray on governor
'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेसाठी लाचारी', अशिष शेलारांची सरकारवर टीका

By

Published : Oct 13, 2020, 1:08 PM IST

Updated : Oct 13, 2020, 4:08 PM IST

15:34 October 13

राज्यपाल हे भाजपाच्या सांगण्यावरून करतायेत - चंद्रकांत खैरैंचा आरोप

राज्यपाल हे भाजपाच्या सांगण्यावरून करतायेत - चंद्रकांत खैरैंचा आरोप

औरंगाबाद - राज्य चांगले चालले, तिथे चांगले सल्ले द्यायला हवे! राज्यपाल भाजपच्या सांगण्यावरून हे करत आहेत. राज्यपाल हे महामहिम आहेत. त्यांनी निपक्षपाती असायला हवं. मात्र ते राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

15:02 October 13

'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेसाठी लाचार', अशिष शेलारांची सरकारवर टीका

'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेसाठी लाचार', असे म्हणत भाजपा नेते अशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना ज्यांनी मुंबईचे पालकमंत्री केले, ते लाचार आहेत. पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! असे शेलार म्हणाले.

14:52 October 13

मंदिरे उघडण्यासाठी साधूंचे शिर्डीत आंदोलन

मंदिरे उघडण्यासाठी साधूंचे शिर्डीत आंदोलन

अहमदनगर - मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, अशा घोषणा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावी, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शिर्डीमध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहेत. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स मैदानात या उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणात साधू भजन-कीर्तनात मग्न आहेत.

14:02 October 13

शिवसेनेचा आत्मा 'हिंदुत्व'च... संजय राऊत यांचे राज्यपालांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनीही आता सरकारची पाठराखण केली आहे. हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्यामुळे आम्हाला कोणाकडूनही हिंदुत्त्वाचे धडे घेण्याची गरज नाही. आम्ही आंतर-बाह्य हिंदुत्ववादी आहोत, असे खासदार राऊत म्हणाले.

13:45 October 13

मंदिरात जाण्यासाठी कायद्याचा धाक दाखवतात का...आमचा अंत पाहू नका; चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण

राज्यभरात मुंबई, कोल्हापूर, अकोला, शिर्डी, पुणे, इ. या ठिकाणी मंदिरं पुन्हा उघडण्यासाठी मागणी करण्यात आली.

उद्धव ठाकरेंच्या पत्राचा मी निषेध करतो. उद्दाम पणाने उत्तर द्यायच होत, तर संजय राऊतांना सांगायच होतं - चंद्रकांत पाटील

13:18 October 13

राज्यभरात मंदिरे उघडण्यासाठी विरोधक आक्रमक...

राज्यभरात मंदिरं उघडण्यासाठी विरोधक आक्रमक...

राज्यभरात मुंबई, कोल्हापूर, अकोला, शिर्डी, पुणे, इ. या ठिकाणी मंदिरं पुन्हा उघडण्यासाठी मागणी करण्यात आली.

13:09 October 13

LIVE : प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरासमोर राडा... भाजपा कार्यकर्ते आक्रमक

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्यभरात भाजपाने आंदोलनं केली. यावेळी मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरासमोर देखील निदर्शने करण्यात आली. कार्यकर्ते आक्रमक होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी धक्काबुक्की झाल्याचे निदर्शनास आले. 

12:52 October 13

धर्मनिरपेक्ष झालात का... राज्यपालांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

मुंबई - राज्यभरात मंदिरं सुरू करण्यावरून वाद पेटला आहे. यामध्ये विरोधी पक्ष भाजपाने मंदिरं पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. आज दिवसभर यासाठी राज्यभरातील विविध मंदिर आणि मुख्य देवस्थानांसमोर आंदोलनं करण्यात आली. त्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Last Updated : Oct 13, 2020, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details