मुंबई -आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरींनी ( MLA Amol Mitkari ) राज्यपाल कोश्यारींवर टीकास्त्र सोडले ( Amol Mitkari criticize governor ) आहे. "महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा." असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे ( Amol Mitkari Tweet ) . राज्यपाल भरगतसिंह कोश्यारी ( Governor Bhargat Singh Koshyari ) यांनी मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे सर्वच स्तरातून राज्यपालांवर टिका होत आहे.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले -आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबईबाबत एक मोठं विधान केले आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटले जाते. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असे थेट विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले . ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.
संदिप देशपांडे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे (controversial statement). महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावे असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.
संजय राऊत यांची टीका -शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावरुन राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मराठ्यांना जागे होण्याचे आवाहनही त्यांच्या वक्तव्यावरुन केले आहे. मराठी माणसाने जागे होऊन याचा तीव्र विरोध केला पाहिजे अशी अपेक्षा राऊत यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.