महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय; सावधानता बाळगा - राज्यपाल - covid 19 update

ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाउंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यपाल
राज्यपाल

By

Published : Feb 21, 2021, 7:15 PM IST

Updated : Feb 21, 2021, 7:27 PM IST

मुंबई - केरळसह महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय बनला आहे. नव्या उद्रेकामुळे सर्वांची जबाबदारी वाढली असून नागरिकांनी सावधानता बाळगा अन्यथा पुन्हा कोरोना येईल, अशी भिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात कोरोना संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाउंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका अनिता किणे उपस्थित होत्या.

कोरोना काळात समाजातील सर्व लोकांनी परस्पर सहकार्याने काम केले. एक दुसऱ्याला मदत केली. डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक यांनी तर उत्तम काम केले. परंतु या काळात विविध सरकारी विभागांनी उल्लेखनीय काम केले, असे राज्यपालांनी नमूद केले. कोरोना संसर्गाच्या काळात लोकांनी पोलिसांवर पुष्प वर्षाव केला. ही अनोखी घटना या काळात पाहायला मिळाल्याचे राज्यपाल म्हणाले.

कोरोनासारखी कितीही संकटे आलीत तरीही त्यांचा निश्चित पराभव-

ईश्वर केवळ मंदिर, मस्जिद व इतर धार्मिक स्थळांपुरता मर्यादित नसून तो सर्व जनाजनात वास करीत आहे. हे जाणून लोकांनी या काळात भगवान बुद्ध व महात्मा गांधींचा करुणा भाव जागविला, असे राज्यपालांनी सांगितले. लोकांमधील सेवा, समर्पण व करुणा भाव टिकून राहिला तर कोरोनासारखी कितीही संकटे आलीत तरीही त्यांचा निश्चित पराभव होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

यांचा सन्मान-


समाजसेवी धनंजय गोसावी, रक्तदाते करण किणे, डॉ संदीप पाटेकर, डॉ हेमांगी घोडे, डॉ अस‍िफ पोची, डॉ रावुत मोईनुददीन, डॉ शर्मीन डिग्रा, डॉ सुदर्शन सोनोणे, डॉ मुमताझ शाह, डॉ कनक गंगाराम, अग्निशामन विभागातील तंबेश्वर मिश्रा, अग्निशामन विभागातील हितेश राऊत, अविनाश किणे (मरणोत्तर), पत्रकार खलील गिरकर, पत्रकार युसुफ पुरी, ठाणे पोलीस हवालदार जुलालसिंग परदेशी, ठाणे पोलीस शांताराम सावंत, मुकादम सफाई कर्मचारी महेश भागराव, समाजसेवी अब्दुला शेख, समाजसेवी मोहम्मद अरिफ शेख, जुझर इस्माईल पेटीवाला, अन्वर अल‍ि मोहमद नुरी, निर्मल सोलंकी, मोहम्मद ओन मोमीन, परवेझ एम ए फरीद, चांद कुरेशी, तृप्ती किणे, अरिफ खान पठान, राजेश देवरुखकर, आकाश पाटील, किशोर बाटेकेर, आरती राहटे, बापु मखरे, ठाणे महानगर पालिकेतील कर विभागातील गिरीश अहिरे, ठाणे महानगर पालिकेतील गिरीश मोरे, नैनेश भालेराव, अनिता किणे, राजन किणे, मोरेश किणे यांना यावेळी राज्यपालांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा-अमरावती शहर आणि अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात सात दिवसांची टाळेबंदी जाहीर

Last Updated : Feb 21, 2021, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details