महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेस्टची प्रवाशांसाठी दिवाळी भेट, ९ रुपयात ५ वेळा प्रवास करा - बेस्टची प्रवाशांसाठी दिवाळी भेट

नवरात्रोत्सव काळात १९ रुपयांत १० दिवसात १० वेळा कधीही कुठेही प्रवास करता येईल अशी योजना राबविली होती. या दोन्ही योजनांना प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ( BEST tickets new rates ) बेस्टने ९ रुपयांत ५ वेळा प्रवास करण्याची योजना जाहीर केली आहे.

Best Bus service
Best Bus service

By

Published : Oct 12, 2022, 8:16 AM IST

मुंबई- आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ( BESTs Diwali gift ) नवनवीन योजना आणल्या जात आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बेस्टने ( BEST package for Diwali ) दिवाळीसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. अवघ्या ९ रुपयांत ५ वेळा प्रवास करता येईल, अशी सुपर सेव्हर योजना जाहीर केली आहे. बेस्टच्या चलो अॅपचा प्रथमच वापर करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा घेता येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून ( Super saver scheme Best ) सांगण्यात आले आहे.


बेस्ट उपक्रमाने याआधी गणेशोत्सव काळात १७९ रुपयात १० दिवस बसमधून प्रवास करण्याची, नवरात्रोत्सव काळात १९ रुपयांत १० दिवसात १० वेळा कधीही कुठेही प्रवास करता येईल अशी योजना राबविली होती. या दोन्ही योजनांना प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ( BEST tickets new rates ) बेस्टने ९ रुपयांत ५ वेळा प्रवास करण्याची योजना जाहीर केली आहे. या तिकिटावर कोणत्याही मार्गांवर आणि एकदाच प्रवास करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही योजना सात दिवसांसाठी वैध राहणार आहे. ही योजना आज बुधवार, १२ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वैध असणार आहे. विमानतळ मार्ग, हॉप ऑन, हॉप ऑफ सेवांसाठी हे तिकीट लागू नसले. त्याव्यतिरिक्त सर्व वातानुकूलित, विना वातानुकूलित बस सेवांसाठी उपलब्ध राहणार आहे.




असे घ्या तिकीट -या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी बेस्टचे चलो अॅप डाउनलोड ( Chalo app download ) करणे आवश्यक आहे. या अॅपच्या बस पास पर्यायाच्या सहाय्याने त्या योजनेचा लाभ घेता येईल. अॅपमधील दिवाळी ऑफरचा पर्याय निवडल्यानंतर त्यात प्रवाशांनी त्यातील माहिती भरुन डेबिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगच्या मदतीने ऑनलाइन पद्धतीने ९ रुपये भरायचे आहेत. त्यानंतर बेस्टमधून प्रवास करताना तिकीट काढण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या मोबाइलमधील फेरी सुरू करा हा पर्याय निवडून मोबाइल तिकीट यंत्राजवळ ठेवताच अॅपवर डिजिटल तिकीट प्राप्त होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details