मुंबई -बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेस्टदिनी (७ ऑगस्ट) बेस्ट वर्कर्स युनियनने संपाची हाक दिली आहे. या संदर्भात आज झालेल्या बैठकीत ज्या घडामोडींची चर्चा झाली ते कामगारांच्या मेळाव्यात मांडण्यात येईल. तसेच मंगळवारी मध्य रात्रीपासून आंदोलन करून संप पुकारायचा की नाही हा निर्णय कामगाराच घेतील, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटले आहे.
संपाबाबत बेस्ट कामगारच घेतील निर्णय : शशांक राव - शिवसेना प्रणित कामगार संघटना
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत व्यवस्थापनाने बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर वेळोवेळी चर्चा करणे भाग होते. पण, त्यात टाळाटाळ करण्यात आल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे.
जानेवारीत झालेल्या संपाच्यावेळी सुद्धा शिवसेना प्रणित कामगार संघटनेने संप फोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, कामगारांनी त्यांचे आदेश न ऐकता संप केला होता. यामुळे आताही कामगारच निर्णय घेऊन आपली एकजूट दाखवतील, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला.
याआधी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ९ जानेवारीपासून ९ दिवसांचा ऐतिहासिक संप केला होता. न्यायालयाच्या मध्यस्थीने तो संप मिटला. त्यानंतर एक सदस्यीय समितीच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत व्यवस्थापनाने बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर वेळोवेळी चर्चा करणे भाग होते. पण, त्यात टाळाटाळ करण्यात आल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे.