मुंबई - माटुंगा येथे 31 जुलैच्या सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास बसला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती बेस्ट समितीत सादर करण्यात आलेल्या अहवालात देण्यात आली. आग लागलेली बस 2 वर्षे जुनी होती. त्यामुळे बेस्ट कमिटी सदस्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, टाटा मोटर्सकडून खरेदी केलेल्या बसबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर प्रशासनाने टाटा मोटर्सच्या १८४ बस तपासणीसाठी परत पाठवाव्यात, अशी मागणी बेस्ट सदस्यांनी केली आहे.
टाटा मोटर्सच्या 184 बसेस तपासणीसाठी परत पाठवा; बेस्ट सदस्यांची मागणी - वरळी आगार
३१ जुलै रोजी एका बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आग लागलेली बस 2 वर्षे जुनी होती. त्यामुळे बेस्ट कमिटी सदस्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, टाटा मोटर्सकडून खरेदी केलेल्या बसबाबत चौकशी करण्याची मागणी केली.
माटुंगामध्ये पेटलेल्या बसमधील अग्निशामक यंत्र घटनेवेळी काम करत नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. सुदैवाने या बसमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. त्यानंतर, सदर बस दादर कार्यशाळेत आणण्यात आली. या आगीत बसचालक केबिन व 6 आसने जळाली आहेत. या घटनेत तातू फर्नांडिस या बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगवधनाबद्दल बेस्ट समितीने त्यांचे कौतुक केले.
त्यामुळे, भविष्यात आगीच्या घटना टाळाव्यात यासाठी सुरक्षितेच्या दृष्टीने टाटा मोटर्स कडून खरेदी करण्यात आलेल्या सर्व 184 बसेस तपासणीसाठी पाठवण्याची मागणी बेस्ट सदस्यांकडून करण्यात आली.