मुंबई -मुंबईची लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी खाजगी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या एसी बसेस चालवल्या जात (BEST cancel contract of mini buses) आहेत. यामधील २८० मिनी बस एमपी ग्रुपकडून चालवल्या जात (BEST contract with MP group) आहेत. या कंपनीकडून ड्रायव्हरला वेळेवर पगार दिला जात नाही, यामुळे सातत्याने संप केला जात आहे. तसेच या बसेसचे मेंटेनन्स ठेवले जात नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एमपी ग्रुपला दिलेले कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून 'ईटिव्ही भारत'ला देण्यात आली (BEST issued notice) आहे.
प्रवासी, खासगी कर्मचारी त्रस्त -मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्टकडून परिवहन सेवा दिली जाते. रेल्वेमधून 75 लाख तर बेस्टमधून ३० लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टकडून खाजगी भाडेतत्त्वावर एसी बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखद झाला आहे. बेस्टने छोट्या रस्त्यासाठी एमपी ग्रुपकडून २८० मिनी एसी बसेस भाडे तत्वावर घेतल्या आहेत. बेस्टच्या ४० मार्गावर या बस चालवल्या जात होत्या. या बसमध्ये एसी चालत नाहीत, त्यांचे मेन्टेनन्स योग्य प्रकारे ठेवले जात नाही, यामुळे प्रवाशांना त्रास होतो. तसेच बेस्टकडून या कंत्राटदाराला वेळोवेळी पैसे दिले जात असले तरी ड्रायव्हरला मात्र पगार वेळेवर दिला जात नाही. यामुळे सातत्याने संप केला जात होता, याचा परिणाम बेस्टच्या सेवेवर होत (mini buses causing exhaustion salary of drivers) होता.