महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Independence Day अखंडित सेवा देणाऱ्या बेस्टचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक - Best international reputation

अतिशय माफक दरात दर्जेदार बससेवा Quality bus services at affordable rates देणाऱ्या बेस्टने Best bus service कोरोना टाळेबंदी काळात देखील आपल्या कार्यक्षम सेवेची परंपरा कायम राखली. त्यामुळेच बेस्ट उपक्रमाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक आहे, अशा शब्दात बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र Lokesh Chandra यांनी कौतुक केले आहे.

Best bus service
Best bus service

By

Published : Aug 15, 2022, 5:04 PM IST

मुंबई अतिशय माफक दरात दर्जेदार बससेवा Quality bus services at affordable rates आणि वीजपुरवठा सेवा अखंडपणे देणाऱ्या बेस्टने Best bus service कोरोना टाळेबंदी काळात देखील आपल्या कार्यक्षम सेवेची परंपरा कायम राखली. त्यामुळेच बेस्ट उपक्रमाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक आहे, अशा शब्दात बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र Lokesh Chandra यांनी कौतुक केले आहे.

माफक दरात दर्जेदार सेवाभारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव Amritmahotsav of Indian Independence देशभरात साजरा केला जात आहे. त्याच प्रमाणे आज बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिकेत विलीनीकरण करून ७५ वर्षे झाली. या पार्श्वभूमीवर लोकेश चंद्र यांनी बेस्ट भवन, कुलाबा येथे ध्वजारोहण केले. यावेळी ते उपस्थित कर्मचारी अधिकारी यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी बोलताना १८७३ साली स्थापन झालेल्या बेस्ट Best कंपनीने सुरवातीला सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून घोड्यांनी ओढली जाणारी ट्राम कुलाबा ते पायधुणीपर्यंत सुरू केली. ७ ऑगस्ट १९४७ साली बेस्ट उपक्रमाचे महापालिकाकरण झाले. २०२२ पर्यंत बेस्टने बेस्टने हळूहळू विजेवरील ट्राम, एक मजली बस, दुमजली बस, पेट्रोल, डिझेल, सीएनजीवरील बससेवा देतदेत आज इलेक्ट्रिक व एसी बससेवा तोटा सहन करीत अगदी माफक दरात बस सेवा देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. यामुळे माफक दरात दर्जेदार बससेवा आणि वीजपुरवठा देण्यात बेस्टने आपले नावलौकिक राखल्याचे चंद्र म्हणाले.


पुढे देखील अशीच सेवाकोरोना सारख्या महामारीत Covid-19, लॉकडाऊन असताना देखील बेस्टने आपल्या कार्यक्षम सेवेची परंपरा कायम राखली. त्याचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय International पातळीवर कौतूक झाल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगत बेस्टच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आज भारतात सर्वाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या फक्त बेस्टकडेच आहेत. बेस्टकडे इलेक्ट्रिक, एसी, दुमजली बससह एकूण ३६८० बसगाड्या असून भविष्यात एकूण १० हजार बसगाड्यांचे लक्ष्य ठेवले आहे. बेस्टच्या सर्व बसगाड्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या असतील, असे प्रशासनाने ठरवले आहे. दुसरीकडे विनाखंडित वीजपुरवठा करणारी बेस्ट ही राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था आहे. या पुढेदेखील बेस्ट उपक्रम अशीच सेवा मुंबईकरांना देत राहील, असा आत्मविश्वासही चंद्र यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचाIndian Independence Day दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी परीधान केलेले वेगवेगळे पोशाख

ABOUT THE AUTHOR

...view details