महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेस्टच्या खर्चावर पालिकेने लक्ष ठेवावे; विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मागणी - मुंबई बेस्ट

करदात्यांच्या पैशांचा हिशेब मिळण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांकडून बेस्टच्या खर्चावर लक्ष ठेवण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 9, 2019, 8:49 PM IST

मुंबई - करदात्यांच्या पैशांचा हिशोब मिळण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांकडून बेस्टच्या खर्चावर लक्ष ठेवण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.

तोट्यात असलेल्या बेस्टला मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त निधी देण्यात येत आहे. आधी १७०० कोटी दिल्यानंतर पालिकेने बेस्टला पुन्हा ४०० कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. बेस्टला दिलेल्या निधीचा हिशेब दिला जात नाही. यावर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी रवी राजा यांच्या मागणीला पाठिंबा दिल्यानंतर या निधीचा हिशेब प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

हेही वाचा मुंबई पालिका बेस्टला पुन्हा देणार ४०० कोटी; बेस्टने अद्यापही पालिकेला नाही दिला खर्चाचा हिशोब

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने ६०० कोटी, तसेच नंतर ११३६ असे एकूण १७०० कोटी रुपये दिले. यानंतर पुन्हा ४०० कोटी रुपये देण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

पालिकेने बेस्टला ११३६.३१ कोटी हे अल्पमुदतीची कर्जाची परतफेड करण्यासाठी दिले होते. मात्र, बेस्टने या अनुदानातून किती कर्जाची परतफेड केली याबाबतचा सविस्तर अहवाल पालिकेला अजूनही दिलेला नाही. यासोबतच बेस्टमध्ये केलेल्या सुधारणांची माहिती पालिकेला पुरवलेली नाही. पालिकेचा महसूल सर्व मार्गांनी कमी होत आहे. अशा वेळी बेस्टला अनुदान देताना पालिकेच्या आर्थिक परिस्थितीसह भविष्याचा विचार करण्याची गरज असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

हेही वाचा दादरमध्ये वाहने पार्क करा अन् बेस्ट बसने सिद्धीविनायकाचे दर्शन घ्या, महापालिका आयुक्तांचा फतवा

पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना बेस्टला २१०० कोटी रुपये दिले आहेत. करदात्या नागरिकांचे २१०० कोटी रुपये बेस्टला दिल्यानंतर त्याचा हिशेब बेस्टचे अधिकारी पालिकेला देत नाहीत. बेस्टला बँकांचे कर्ज फेडण्यासाठी १२०० कोटी रुपये देण्यात आले होते. बेस्टने यामधील ५५० कोटी रुपये बँकांचे कर्ज फेडण्यासाठी वापरले आहेत. उर्वरित ३०० ते ४०० कोटी रुपये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीसाठी देऊ केले आहेत. तसेच २०० कोटी रुपये बेस्टमधील कंत्राटदारांना देण्यात आले.

हेही वाचा मुंबईत बेस्ट कामगार संपावर? संप होणारच नाही, महोपौरांचे वक्तव्य

यावरून बेस्टला ज्या कामासाठी पैसे दिले त्या कामासाठी पैसे न वापरता इतर कामांसाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बेस्टच्या कारभारावर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष ठेवण्याची मागणी रवी राजा यांनी केली आहे. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, भाजपाचे प्रभाकर शिंदे या नगरसेवकांनी, 'बेस्टला मदत करताना पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा', अशी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details