मुंबई- मुंबईकर प्रवाशांची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाचा सन् २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा १,८८७.८३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प दोन दिवसांच्या चर्चेनंतर बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला. बेस्ट समितीत मंजूर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प स्थायी समिती व पालिका सभागृहात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
विद्युत विभागही तोट्यात -
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना सन् २०२१-२२ चा १,८८७.८३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प १० ऑक्टोबरला सादर केला होता. या अर्थसंकल्पात विद्युत पुरवठा विभागाचे ३,५३२.३० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले असून खर्च ३,५९५.८९ कोटी रुपये अपेक्षित आहे. विद्युत विभागात २,६३.५९ कोटी रुपये तूट दर्शविण्यात आली आहे. अनेक वर्षात तोट्यात असलेल्या परिवहन विभागातही १,४०७ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आले आहे. तर ३०३१.२४ कोटी रुपये खर्चाचा आंदाज आहे. परिवहन विभागात १,६२४.२४ तूट दाखविण्यात आली आहे. विद्युत आणि परिवहन दोन्ही विभागांसाठी मिळून ४,९३९.३० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षिण्यात आले असून ६,८२७.१३ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला १,८८७.८३ कोटी रुपयांची तूट येणार आहे.
अर्थसंकल्पावर दोन दिवस चर्चा -
बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान बेस्ट समिती सदस्यांनी तूट भरून काढण्याबाबत अनेक सूचना केल्या. चर्चेदरम्यान कोरोना काळातही कर्मचाऱ्यांना चार्जशीट देण्यात आल्याचा निषेध करत भाजपाने सभात्याग केला. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून स्थायी समिती व सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी दिली.
भाजपचा सभात्याग -
कोरोना संंकटसमयी आजही बेस्ट उपक्रमातील कर्मचारी लढा देत आहेत. या कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांना चार्जशीट काढण्यात आली ती मागे घ्या, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधर यांनी केली. अर्थसंकल्प मंजूर करण्यास भाजपचा पाठिंबा आहे. मात्र महाव्यवस्थापकांनी चार्जशीट मागे घेण्याबाबत काही उत्तर न दिल्याने भाजपने सभात्याग केल्याचे बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले.
दोन वर्षात बेस्टने बसवले २ लाख इलेक्टॉनिक मीटर -