मुंबई - बेस्ट उपक्रमाने BEST Bus लाखो प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी खासगी बस BEST Bus Private Service भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. या बसमुळे प्रवाशांना चांगल्या व आरामदायी सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे. मात्र या बसवरील चालकांना BEST Bus Private Driver वेळेवर पगार दिला जात नसल्याने आंदोलने करण्यात आली आहेत. आज चालकांना तिकीट काढून प्रवास करा, असे सांगण्यात आल्याने काम बंद आंदोलन करण्यात आले. यामुळे खासगी बस प्रवाशांना Best Bus Private Service Is Harrowing To Passengers तापदायक ठरत आहेत.
बेस्टच्या ताफ्यात खासगी बस - मुंबईमध्ये ट्रेन Mumbai Local Train आणि बेस्टची बस BEST Bus हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन आहे. ट्रेन आणि बेस्टला लाईफलाईन BEST Bus बोलले जाते. बेस्टने दिवसाला ३० लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टवर सुमारे ९ हजार कोटीचे कर्ज आहे. महापालिकेने बेस्टला Mumbai Municipal Corporation Help To BEST ४५०० कोटी आर्थिक मदत केली आहे. लाखो प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टने कंत्राटदाराकडून एसी बस भाडे तत्वावर घेतल्या आहेत. या बसचा खर्च बेस्टच्या इतर चालवल्या जाणाऱ्या बस पेक्षा कमी असल्याने बेस्टच्या महसुलात वाढ होत आहे.
कंत्राटी बसचा प्रवाशांना त्रास - बेस्टला फायदेशीर असलेल्या या खासगी बसवर BEST Bus Private Driver कंत्राटदाराचे चालक नियुक्त करण्यात आले आहेत. कंत्राटदाराला बेस्टकडून वेळेवर पैसे दिले जात असताना कंत्राटदार मात्र चालकांना वेळेवर पगार देत नाही. त्यामुळे याआधी दोन ते तीन वेळा आंदोलन करण्यात आले आहे. बेस्टच्या खासगी बसच्या BEST Bus चालकांकडून तिकीट घेतले जात असल्याने आज पुन्हा शिवाजी नगर आगारात Shivaji Nagar Bus Depot Mumbai पहाटे ५.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. १०० बस बाहेर रस्त्यावर आल्या नसल्याने प्रवाशांना त्रास झाला. इतर खासगी वाहनांनी अधिकचे पैसे खर्च करून प्रवाशांना आपल्या नियोजित स्थळी जावे लागले.
कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई -कंत्राटी कामगारांनी त्यांना बसमध्ये तिकीट काढावे लागत असल्याने शिवाजीनगर आगारात BEST Bus Driver Protest In Shivaji Nagar Bus Depot Mumbai आंदोलन केले होते. परंतु त्यांच्या कंत्राटदारांने त्यांना चलो बसपास देण्याचे कबूल केल्याने आंदोलन मिटले आहे. मात्र नियमानुसार कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा Devendra Fadnavis Meet Ashok Chavan उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांमध्ये भेट!