महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 7, 2022, 1:18 PM IST

ETV Bharat / city

BEST Mumbai : 'बेस्ट' कडून ७ महिन्यात २३ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई

बेस्ट उपक्रमाच्या बसमधून विना तिकीट प्रवास किंवा तिकीट काढलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास केल्यास संबंधित प्रवाशांवर (BEST Action against twenty three thousand ) कारवाई केली जाते. विना तिकीट प्रवास ( action free passengers ) करणे कायदेशीर गुन्हा आहे. प्रवाशांनी तिकिट काढून आरामदायी प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

BEST Mumbai
बेस्ट

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसमधून विना तिकीट प्रवास किंवा तिकीट काढलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास केल्यास संबंधित प्रवाशांवर कारवाई केली जाते. जानेवारी ते जुलै २०२२ या ७ महिन्याच्या कार्यकाळात २३ हजार १०० फुकट्या प्रवाशांवर (BEST Action against twenty three thousand ) कारवाई करण्यात आली आहे. तसेच १४ लाख ५८ हजार ३२६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. ( action free passengers )

२३ हजार १०० फुकट्या प्रवाशांवर कारवाई :बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असल्याने खासगी भाडेतत्वावर एसी बसेस चालवल्या जात आहेत. या बसेसमुळे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा बेस्टची आहे. मात्र बेस्टमधून जानेवारी महिन्यात ३६७३ फुकट्या प्रवाशांकडून २ लाख ३४ हजार १६८, फेब्रुवारी महिन्यात ३१०४ फुकट्या प्रवाशांकडून १ लाख ९७ हजार ४०७, मार्च महिन्यात ३५३९ फुकट्या प्रवाशांकडून २ लाख २३ हजार २६७, एप्रिल महिन्यात ३१२१ फुकट्या प्रवाशांकडून १ लाख ९८ हजार ५२८, मे महिन्यात ३१७२ फुकट्या प्रवाशांकडून २ लाख ८९३, जून महिन्यात ३२९८ फुकट्या प्रवाशांकडून २ लाख ५ हजार ३४८ तसेच जुलै महिन्यात ३१९३ फुकट्या प्रवाशांकडून १ लाख ९८ हजार ७१५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी ते जुलै २०२२ या ७ महिन्यात २३ हजार १०० फुकट्या प्रवाशांकडून १४ लाख ५८ हजार ३२६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.



विना तिकीट प्रवास टाळा :स्वस्त, सुरक्षित, आरामदायी व गारेगार प्रवास म्हणून प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या बेस्ट साध्या बसचे तिकीट किमान ५ रुपये व वातानुकूलित बसचे ६ रुपये तिकीट आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्वस्त तिकिटात आरामदायी प्रवास करता येतो. त्यामुळे विना तिकीट प्रवास करणे कायदेशीर गुन्हा आहे. प्रवाशांनी तिकिट काढून आरामदायी प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details