नवी मुंबई -खारघरमधील प्रेमभंग झालेल्या तरूणीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंगाली बाबाच्या नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून मुसक्या आवळल्या आहेत. प्रियकराचे दुसऱ्या मुलीबरोबर लग्न ठरल्याने तरूणी वैफल्यग्रस्त झाली होती. रेल्वेत लावलेल्या बंगाली बाबाच्या जाहिरातीला आकृष्ट होऊन प्रियकराने आपल्याकडे पुन्हा यावे म्हणून बंगाली बाबाची मदत घेतली होती. मात्र, बंगाली बाबाने भावनांचा फायदा घेत तरूणीला तब्बल साडे चार लाखांना गंडा घातला आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणींने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेशातील मेरठ येथील बंगाली बाबाच्या मुसक्या आवळल्या आहे.
प्रेमभंग झाल्याने तरूणी वैफल्यग्रस्त -
खारघरमधील तरुणीचे एका तरुणांवर अतोनात प्रेम होते. मात्र, तिच्या प्रियकराने त्या तरुणींला धोका देत तिच्या बरोबर लग्न करण्यास नकार दिला. दुसऱ्यांच एका तरूणीशी त्याने विवाह देखील ठरला होता. त्यामुळे प्रेमभंग झाल्याने पीडित तरुणी ही वैफल्यग्रस्त झाली होती.
बंगाली बाबाची जाहिरात पाहून तरुणीने आकृष्ट -
प्रेम संबंधातील अडचणीत उपाय पाहिजे असेल तर मोबाईल क्रमांकावर संपर्क करा असे ट्रेनमधील जाहिरातीवर लिहिले होते. त्यामुळे ती वैफल्यग्रस्त तरुणी या जाहिरातीकडे आकृष्ट झाली. या जाहिरातीमुळे तरुणीला आपला प्रियकर आपल्याकडे परत येईल ही आशा वाटू लागली. त्यामुळे तिने बंगाली बाबाच्या जाहिरातीवरील क्रमांकावर संपर्क साधला होता.