नवी मुंबई - नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सिडकोतर्फे करण्यात येत आहे. मात्र हे काम करताना पुरातत्व खात्याच्या नियमांना बगल देत आणि निकृष्ट दर्जाचे सिमेंट, रेती वापरून काम करण्यात आले. याबाबत राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी चौकशीची मागणी केली होती.
बेलापूर किल्ल्याच्या कामाची चौकशी होणार; अमित देशमुखांनी दिले आदेश - राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष नितीन चव्हाण
नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सिडकोतर्फे करण्यात येत आहे. मात्र हे काम करताना पुरातत्व खात्याच्या नियमांना बगल देत आणि निकृष्ट दर्जाचे सिमेंट, रेती वापरून काम केले असल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली होती. यावर अमित देशमुख यांनी पुरातत्त्व विभागाचे संचालक गर्गे ह्यांना त्वरित बेलापूर किल्ल्याच्या होणाऱ्या कामाच्या पाहणीचे, आणि गरज पडल्यास काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिडको संचालक संजय मुखर्जी यांना बेलापूर किल्ल्याच्या कामाची चौकशी करण्याकरिता सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई प्रभारी तेजस शिंदे, उपाध्यक्ष नितिन नाना चव्हाण, श्रीकांत माने, अमोल मापारी उपस्थित होते.