महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात.. मधुमेह व हृदयरोगाच्या रुग्णांनाही मिळणार लाभ - कोरोना लसीसकण

संपूर्ण देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. तसेच 45 ते 60 वयोगटातील ज्या नागरिकांना मधुमेह किंवा हृदयरोगाचा धोका आहे त्यांना सुद्धा कोरोनावरील लस मिळणार आहे.

Beginning of the third phase of corona vaccination
Beginning of the third phase of corona vaccination

By

Published : Mar 1, 2021, 3:14 PM IST

Updated : Mar 1, 2021, 3:23 PM IST

मुंबई - आजपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली. 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. तसेच 45 ते 60 वयोगटातील ज्या नागरिकांना मधुमेह किंवा हृदयरोगाचा धोका आहे त्यांना सुद्धा कोरोनावरील लस मिळणार आहे. संपूर्ण देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची भरपूर मोठ्या प्रमाणावर रांग दिसून आली आणि ऑनलाईन सिस्टम काम करत नसल्यामुळे बहुतेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात थांबावे लागले. यामुळे लसीकरणाला उशीर झाला आणि यामुळेच नागरिकांची निराशा देखील झाली. या टप्प्यात देशभरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय 60 वर्षांवर आहे. या सर्व नागरिकांना कोरोना लसीचा लाभ मिळणार आहे. या सोबतच 45 ते 60 वयोगटातील असे नागरिक ज्यांना मधुमेह किंवा हृदयरोगाचा त्रास होत आहे, अशा सर्व नागरिकांना कोरोना लसीकरणाच्या तिसरा टप्प्यात लाभ मिळणार आहे.

मधुमेह व हृदयरोगाच्या रुग्णांनाही मिळणार लसीकरणाचा लाभ
मुंबईतील दहिसर येथील कोविड सेंटरमध्ये याची जय्यत तयारी सुरू झाली असून एका वेळेस जवळपास 280 रुग्णांना एकाच वेळेस लस देण्याची तयारी येथे पूर्ण झाली आहे.दहिसर कोविड सेंटरमध्ये दोन विभाग केले असून येथे निरीक्षणासाठी सतत डॉक्टरांचे एक पथक निरीक्षणासाठी दिसत आहे.सध्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद हा उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Last Updated : Mar 1, 2021, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details