मुंबई -मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर आज मोर्चा काढला जाणार आहे. राज्यात वाढती महागाई व देशात वाढत्या बेरोजगारीविरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे ( rising inflation and unemployment in india ). त्याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच महाराष्ट्राविषयी अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यानिषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे. पण मोर्चाआधीच मुंबई पोलीसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची मुस्काटदाबी सुरु केलेली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांची मुस्काटदाबी - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर आज मोर्चा काढला जाणार आहे ( Bhai Jagtap lead march at Raj Bhavan ) . विविध मुद्द्यांवर काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याच पहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीसा पाठवल्या ( Mumbai police sent notices to Congress leaders ) आहेत. काल रात्रीपासूनच पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरु केले आहे. बऱ्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करुन बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.