महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Elections 2022: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे सौंदर्यीकरण - Beautification of Mumbai

BMC Elections 2022: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( Municipal elections ) पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु करण्यात आली आहे. पालिकेची निवडणूक ( Mumbai Municipal Elections ) डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पूर्वी विकास कामे, शुशोभीकरणाची कामे मार्गी लावून मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ( Trying to attract Mumbaikar voters ) सरकारकडून केला जात आहे. Beautification of Mumbai in the wake of BMC Elections

Municipal elections
मुंबई महानगरपालिका निवडणुक

By

Published : Oct 6, 2022, 9:13 PM IST

मुंबई - BMC Elections 2022: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( Municipal elections ) पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु करण्यात आली आहे. यापैकी ५० टक्के कामे डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत तर, मार्च २०२३ अखेरपर्यंत सर्व कामे मार्गी लावा, असे आदेश पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. पालिकेची निवडणूक ( Mumbai Municipal Elections ) डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पूर्वी विकास कामे, शुशोभीकरणाची कामे मार्गी लावून मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ( Trying to attract Mumbaikar voters ) सरकारकडून केला जात असल्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. Beautification of Mumbai in the wake of BMC Elections

असे होणार मुंबईचे सुशोभीकरण -मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून त्याचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे हाती घेतली आहेत. रस्त्यांचे पुनर्पृष्‍टीकरण, झेब्रा क्रॉसिंग, रस्ते दुभाजकांमधील मोकळ्या जागेत सुशोभित फुलझाडांची हिरवळीची लागवड, १५ किलोमीटर लांबीच्या फुटपाथवर स्टॅम्प काँक्रिट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्या, पदपथांवर जिथे शक्य आहे. तिथे नाविन्यपूर्ण, कलापूर्ण व परिसर सौंदर्य वाढविणारी आसने लावणे, पथदिव्यांचे सुशोभीकरण, विद्युत खांबांना प्रकाश योजना, अनधिकृत केबल, लटकलेल्या तारा काढून टाकणे आदी कामे केली जणार आहेत. तसेच मुंबई महानगराला इतिहासाचा वारसा असून महानगरात असलेल्या किल्ल्यांवर विद्युत रोषणाई करण्यात यावी, त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल. तसेच भारताचे प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात यावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.


पूल, स्कायवॉकचे सुशोभीकरण -पूल आणि उड्डाणपूलांवर रंगरंगोटी,विद्युत रोषणाई, उड्डाणपुलांखालील जागेवर असलेले टाकाऊ साहित्य हटवून स्थानिक नागरिकांना विरंगुळा मिळेल, मुलांना खेळता येईल, वृद्धांना चालता येईल, अशा रीतीने क्षेत्र निर्माण केले जाणार आहे. स्कायवॉकचा सर्वसामान्य नागरिकांनी उपयोग करावा, विशेषतः रात्रीच्या वेळी लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे. या दृष्टीने स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत योजनेची कामे करावीत. तसेच विद्युत सुशोभीकरण करावे. वाहतूक बेटांची निवड करून त्यांचे अद्ययावतीकरण आणि सुशोभीकरण करावे. समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता राखून विद्युत व्यवस्था करणे, किनारे सुशोभित करण्यासाठी आकर्षक प्रकाश योजना करावी. असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

जाहिरात फलक होणार डिजिटल -जगभरात आता पारंपरिक जाहिरात फलकांच्या ऐवजी डिजिटल जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व अधिकृत जाहिरात फलक येत्या ६ महिन्यात टप्प्याटप्प्याने डिजिटल जाहिरात फलकांमध्ये रूपांतरित करण्यात येतील. प्रामुख्याने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवरील सर्व जाहिरात फलक १०० टक्के डिजिटल करण्याचे नियोजन आहे. डिजिटल जाहिरात फलक कमी वेळेमध्ये बदलता येतात आणि अधिक आकर्षक असल्याने अधिक उत्पन्न देणारे ठरतील. त्यासाठी नवीन जाहिरात धोरण लवकर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न -राज्यात सध्या राजकीय उलथापालट झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आले आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे तसेच भाजपाकडून टीका टिपण्या होत आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. यामुळे येत्या निवडणुकीत दगा फटका होऊ शकतो. यासाठी मुंबईचे सुशोभीकरण हाती घेऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी प्रतिक्रिया पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details