महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सावधान! पालकांनो आपली मुलं काय करत आहेत? - pubji

16 वर्षीय मुलानं पब्जी गेम खेळण्याच्या नादात पैश्यांची उधळण केली आहे. त्याने आपल्या आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात घडला आहे. जेव्हा आई-वडिल या घटनेवरून त्याला चांगलेच ओरडले, तेव्हा तो मुलगा घर सोडून पळून गेला. ही घटना बुधवारी घडली आहे.

पब्जी गेम (फाईल फोटो)
पब्जी गेम (फाईल फोटो)

By

Published : Aug 30, 2021, 7:21 PM IST

मुंबई - एका 16 वर्षीय मुलानं पब्जी गेम खेळण्याच्या नादात पैश्यांची उधळण केली आहे. त्याने आपल्या आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात घडला आहे. जेव्हा आई-वडिल या घटनेवरून त्याला चांगलेच ओरडले, तेव्हा तो मुलगा घर सोडून पळून गेला. ही घटना बुधवारी घडली आहे. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. मुलाचा शोध घेतला असता हा मुलगा अंधेरी परिसरात सापडला आहे.

'इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला'

या ऑनलाईन गेमच्या जमान्यात अल्पवयीन मुल मोठ्या प्रमाणात पैसा उडवत आहेत. त्यामुळे पारकांनी आपली मुलं नक्की काय करत आहेत हे पाहने जास्त महत्वाचे झाले आहे. असे मत सायबर सायकोलॉजिस्ट आणि इंटरनेट एडिक्शन थेरेपिस्ट निराली भाटिया यांनी व्यक्त केले आहे.
अभ्यासापासून ते खेळ हे सर्व आपण इंटरनेटवरच करत आहोत. ऑनलाइन गेम पॉपुलर झाले आहेत. मुल गेम खेळणारच आहेत. मुलांच्या वाढीत गेम हे असतातच. तो त्यांच्या वाढीचा एक भाग आहे. परंतु, आपली मुलं इंटरनेट वापर असताना नेमकी काय करत आहेत. याची माहिती एक पालक म्हणून प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. ते कितीवेळ इंटरनेटवर असतात, कोणता गेम ते इंटरनेटवर खेळत आहेत. पालकांना देखील त्या गेमची माहिती असायला पाहिजे. पालक समजुतदार आहेत. पालकांना गेमचे ज्ञान असायला पाहिजे. त्या गेममुळे कोणत्या प्रकारची हानी होऊ शकते याची माहित पालकांना असली पाहिजे. या ऑनलाइन गेममध्ये पुलिंग, थ्रेटनिंग आणि हॅराशमेंट खूप होत आहे. पालकांनी या बाबत जागृक असले पाहिजे असही भाटिया या म्हणाल्या आहेत.

'लहान मुलं आणि तरुण मुलांमध्ये 'हा' एकच फरक'

मुलांचे पालकांनी निरीक्षण करणे गरजेचे आहे. जर एखादा गेम भेटला नाही, तर मुल चिडचीड करतात. प्रेशरमध्ये असतात. गेम्स मुलांना सेन्स ऑफ एचिव्हमेंट प्रव्हाईड करतात. त्यामुळे लहान मुलच नाही तर तरुणही गेम खेळत असतात. लहान मुलं आणि तरुण मुलांमध्ये एकच फरक आहे की, तरुण मुलांना माहित आहे की आपल्याला कुठे थांबायचं आहे. मात्र, अल्पवीय मुले आपली लाईन ड्रॉ करु शकत नाहीत, त्यामुळे पालकांचे त्यांच्याकडे लक्ष असायला हवे.

'पालकांनीही जागृक झाले पाहिजे'

कधी-कधी अल्पवीय मुलांना काहीजण आमिष दाखवतात, की मी तुला एखादी स्टेज पार करुन देतो त्यासाठी काही पैसे मला दे. ही एक लेव्हल आहे जेथे मुलं ट्राजेक्शन करत आहेत. जर अशी काही मिस्टेक झाली तर त्यांना रागवू नका जर रागवलो तर मुलं खोट बोलतील. त्यासाठी पालकांनीही जागृक झाले पाहिजे. आपल्या आजूबाजूला कशा स्वरुपाचे सायबर क्राईम होत आहेत. याची जाण पालकांनी ठेवली पाहिजे आणि मुलांना समजावून सांगितले पाहिजे असही भाटीया म्हणाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details