महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BDD Chawl Redevelopment Project : बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाला ब्रेक लागणार? - Advocate Gunratna Sadavarte on bdd chawl

बीडीडी चाळवासियांना 500 चौरस फुटाचे  टू बी एच के घर मिळणार आहे. येत्या 36 महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांना चाव्या दिल्या जातील, अशी घोषणा करण्यात आली. मात्र, चाळीतील काही रहिवाशी या घोषणेवर समाधानी नसल्याचं दिसून येत आहे.

bdd chawl
बीडीडी चाळ

By

Published : Aug 6, 2021, 5:19 PM IST

Updated : Aug 6, 2021, 5:47 PM IST

मुंबई -बीबीडी चाळीचं पुनर्वसन केलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, वरळी विधानसभेचे आमदार अदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. बीडीडी चाळवासियांना 500 चौरस फुटाचे टू बी एच के घर मिळणार आहे. येत्या 36 महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांना चाव्या दिल्या जातील, अशी घोषणा देखील करण्यात आली. मात्र, बीडीडी चाळीतील काही रहिवाशी या घोषणेवर समाधानी नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची काही रहिवाशांनी भेट घेतली आहे. 800 चौरस फुटाचे घर मिळावे अशी मागणी केली आहे. जर 800 चौरस फुटाचे घर मिळाले नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी देखील झाली असल्याचं मत सदावर्ते यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा -बीडीडी चाळ वासियांचे कसे असेल नवे घर?, जाणून घ्या

  • गुणरत्न सदावर्तेंचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज-
    वकील गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मुंबईतल्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांनी माझी भेट घेतली आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांना 800 चौरस फुटाचं घर मिळू शकतं. सरकारनं रहिवाशांना ते घर द्यावं. एखाद्या विकासकाला फायदा पोहचेल असं धोरण असू नये. रहिवाशांना 800 चौरस फुटाचं घर देणं सहज शक्य आहे. माझं सरकारला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज दिले आहे. आपण श्रमिक रहिवाशांना 800 चौरस फुटाचं घर द्यावं, अन्यथा आम्ही आमची न्यायालयीन लढाई चालू करु. कशाप्रकारे 800 चौरस फुटाचं घर देऊ शकतो याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. आम्ही श्रमिकांची बैठक बोलावली आहे. त्याचे रायटप आम्ही तुम्हाला सादर करू आणि विकासकांच्या ओठाला पाणी लावू नका. 800 चौरस फुट घर द्या, अन्यथा हा प्रोजेक्ट आम्ही चालू देणार नाही, असे सदावर्ते यांनी सांगितले.

  • गुणरत्न सदावर्तेंची कुणी भेट घेतली आम्हाला कल्पना नाही - राजू वाघमारे
    अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष राजू वाघमारे

अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष राजू वाघमारे म्हणाले, बीडीडी चाळवासियांकडून कोणी मागणी केली हे मला माहिती नाही. आखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघ यांच्यामार्फेत हा लढा मागची सात वर्ष आम्ही लढत आहोत. आम्ही 800 चौरस फुटाची मागणी केली नाही. किंवा एखादा रहिवाशी अशी मागणी करतोय अशी माहिती आम्हाला कधीच मिळाली नाही. आम्ही मागणी केली आहे की, 33/5 खाली आम्हाला 200 चौरस फुट जास्त मिळावं आणि ते जर शक्य नसेल तर 33/9 खालीच आम्हाला 700 चौरस फुट द्यावं. जरी 700 चौरस फुट नाही शक्य तर आम्हाला कमीत कमी 100 चौरस फुट तरी वाढवून द्यावं. 800 चौरस फुटाच्या मागणीचा आमचा कोणताही संबंध नाही.

वाघमारे पुढे म्हणाले की, सरकार सकारात्मक आहे. प्रकल्प मार्गी लावण्याचं काम सुरू असून, जीआर काढण्याच्या तयारीत आहे. मात्र, जर जीआर काढला नाही तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरुन आंदोलन करू. मात्र कोर्टात जाऊन प्रोजेक्ट बंद करण्याची आमची भूमिका कधीच नव्हती आणि रहिवाशांची देखील भूमिका तशी नाही. माझी विनंती आहे सगळ्यांना आता जर प्रोजेक्ट सुरू होतोय तर आपण सकारात्मक असलं पाहिजे.

हेही वाचा -बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून निर्माण होणार 8 हजार 120 घर, म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांची माहिती

Last Updated : Aug 6, 2021, 5:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details