महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Press : 'झुकेंगे नही' शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी; पत्रकार परिषदेसाठी LED स्क्रीनची व्यवस्था - Banners of Jhukenge Nahi outside Shiv Sena Bhavan

शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी बॅनरबाजी केल्याचे (Banner near Shivsena Bhavan) पाहायला मिळाले. शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाकडून वाघाचा फोटो असलेले 'झुकेंगे नही' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

banner
बॅनरबाजी

By

Published : Feb 15, 2022, 3:37 PM IST

मुंबई - 'बहोत बरदाश किया आता बस' असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी आज (15 फेब्रुवारी) 4 वाजता पत्रकार परिषद (Shivsena Press Conference) घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी बॅनरबाजी केल्याचे (Banner near Shivsena Bhavan) पाहायला मिळाले. शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाकडून वाघाचा फोटो असलेले 'झुकेंगे नही' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

  • पोलीस बंदोबस्तात वाढ -

शिवसेना भवनाबाहेर नेहमीच पोलिसांची सुरक्षा असते. मात्र, आज होणाऱया या पत्रकार परिषदेसाठी प्रमुख नेते व शिवसेनेचे आमदार, खासदार येणार आहेत. त्यामुळे शिवसेना भवनाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना भवनात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. येथे मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील एक श्वानसुद्धा आणण्यात आला आहे.

  • रस्त्यावर LED स्क्रीन-

संपूर्ण महाराष्ट्राने आमची आजची पत्रकार परिषद पाहावी असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनाबाहेर मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. यावर आजच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

  • पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष -

दरम्यान, आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत व इतर नेते नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद पाहण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details