महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bandra Worli Sea Link Road Accident : वांद्रे वरळी सी लिंक अपघात प्रकरणी आरोपी इरफानला अटक - 5 people died in Bandra Worli Sea Link accident

वांद्रे वरळी सी लिंक रोड अपघात प्रकरणी ( Bandra Worli Sea Link Road Acciden ) आरोपी इरफान अब्दुल रहीम बीलकिया याला पोलिसांनी अटक ( Accused Irfan Abdul Rahim Bilkia arrested ) केली आहे. आयपीसीच्या कलम ३०४ प्रमाणे ओव्हर स्पीडिंग, रॅश ड्रायव्हिंग केल्याने त्याला अटक केली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू ( 5 people died in Bandra Worli Sea Link accident ) झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.

वांद्रे वरळी सी लिंक रोड अपघात
वांद्रे वरळी सी लिंक रोड अपघात

By

Published : Oct 6, 2022, 12:28 PM IST

Updated : Oct 6, 2022, 10:33 PM IST

मुंबई - मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या अपघातातील ( ( Bandra Worli Sea Link Road Acciden ) ) आरोपी इरफान अब्दुल रहीम बेलकिया याला पोलिसांनी अटक ( Accused Irfan Abdul Rahim Bilkia arrested ) केली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या अपघातातील ( Accident on Bandra Worli Sea Link ) आरोपी इरफान अब्दुल रहीम बेलकिया याला पोलिसांनी अटक केली. आरोपीवर आयपीसी कलम 304 अंतर्गत वेगाने वाहन चालवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर, १३ जण जखमी झाले. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण -बुधवारी पहाटे मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ७६ आणि ७८ क्रमांकाच्या पोलजवळ पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

काही वेळापूर्वी येथे आणखी एक अपघात -जिथे हा अपघात झाला तिथे काही वेळापूर्वी रस्ता अपघात झाला होता. जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिकाही उभी होती. तसेच काही वाहनेही रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रुग्णवाहिका, तेथे उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली, यात पाच जणांचा मृत्यू झाला. गजराज सिंग (26, रा. मध्य प्रदेश), सत्येंद्र फौजदार (27, रा. भरतपूर), राजेंद्र (40, रा. झाशी), चेतन कदम, रुग्णवाहिका चालक सोमनाथ साळवे अशी मृतांची नावे आहेत. सत्येंद्र, राजेंद्र, गजराज सी लिंकवर सुरक्षा रक्षक होते.

Last Updated : Oct 6, 2022, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details