महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वांद्रे वरळी सी लिंक वाहतुकीसाठी सुरू; तौक्ते चक्रीवादळामुळे होता बंद - tauktae cyclone effect

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेला मुंबईतील सुप्रसिद्ध वरळी- वांद्रे सी लिंक वाहतुकीसाठी आज खुला करण्यात आला आहे.

Bandra Worli Sea link
वांद्रे वरळी सी लिंक

By

Published : May 18, 2021, 8:15 PM IST

मुंबई -तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेला मुंबईतील सुप्रसिद्ध वरळी- वांद्रे सी लिंक वाहतुकीसाठी आज खुला करण्यात आला आहे. वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातील माहिती ट्विटवरून दिली.

हेही वाचा -बीकेसी कोविड सेंटरचे वादळामुळे कोणतेही नुकसान नाही उगाच राजकरण करू नका - महापौर

अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते वादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबईतील समुद्र किनाऱ्याला बसला. सध्या हे तौक्ते वादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये या वादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून सी लिंक बंद ठेवण्यात आला होता. लोकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता मात्र सी लिंक सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.

हेही वाचा -ऐरोलीत १४ वर्षाच्या मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details