महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nigerian Drug Peddler Arrest : मुंबईत एक कोटीच्या ड्रग्जसह नायजेरियन व्यक्तीला अटक - मुंबई ड्रग्ज पडकले

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या बांद्रा युनिटने ( Bandra NCB Arrest Nigerian Drug Peddler ) गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथे छापा टाकत एकूण ४०७ ग्रॅम ( NCB Confiscated Drug In Mumbai ) वजनाचे कोकेन जप्त केले होते.

NCB Arrest Nigerian Drug Peddler
NCB Arrest Nigerian Drug Peddler

By

Published : Feb 12, 2022, 12:25 AM IST

मुंबई -अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या बांद्रा युनिटने ( Bandra NCB Arrest Nigerian Drug Pedler ) गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथे छापा टाकत एकूण ४०७ ग्रॅम ( NCB Confiscated Drug In Mumbai ) वजनाचे कोकेन जप्त केले होते. याप्रकरणी अंधेरी परिसरातून एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली होती. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पॉल इबे एन्झोकू (31), असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ड्रग्जची किंमत 1 कोटी -

10 फेब्रुवारी रोजी मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने अंधेरी परिसरातून एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक केली. त्याच्याकडून सुमारे 407 ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटीच्या जवळपास आहे. नार्कोटिक्स सेलच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती मिळाली होती की, एक गट मुंबईत अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येत आहे. हे ड्रग्ज पेडलर कपड्याच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी करतात. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा -BJP MLAs Suspension : विधिमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांचा घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रपतींना निवेदन

ABOUT THE AUTHOR

...view details