महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hindustani Bhau : वांद्रे न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळला - वांद्रे न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

वांद्रे न्यायालयाने ( Bandra Court ) हिंदुस्थानी भाऊ यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने जामीनाला पोलिसांनी विरोध केला आहे. धारावी परिसरात विद्यार्थ्यांनी केलेल्या ( Dharavi Student Agitation ) आंदोलनाला हिंदुस्थानी भाऊ जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते.

हिंदुस्थानी भाऊ
हिंदुस्थानी भाऊ

By

Published : Feb 8, 2022, 6:50 PM IST

Updated : Feb 8, 2022, 7:24 PM IST

मुंबई -बेकायदेशीर आंदोलन करणे तसेच हिंसक कृत्य करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊचा ( Hindustani Bhau Bail Application Rejected ) जामीन अर्ज वांद्रे न्यायालयाने ( Bandra Court ) फेटाळला आहे. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने जामीनाला पोलिसांनी विरोध केला आहे. धारावी परिसरात विद्यार्थ्यांनी केलेल्या ( Dharavi Student Agitation ) आंदोलनाला हिंदुस्थानी भाऊ जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करून धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली होती. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हिंदुस्थानी भाऊचे वकील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

३१ जानेवारी रोजी मुंबईच्या धारावी परिसरात दहावी बारावीच्या ऑफलाइन परीक्षाविरोधात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. यावेळी हिंदुस्तानी भाऊ देखील उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याआधी हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्याने विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देण्याची सक्ती का केली जात आहे ? असा प्रश्न करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना चिथवण्यात हिंदुस्तानी भाऊचा हात होता, हे सिद्ध झाल्यानंतर हिंदुस्तानी भाऊवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. हिंदुस्तानी भाऊ विरोधात इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चिथवल्याप्रकरणी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे दंगल, महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -Nana Patole Criticized Narendra Modi : 'शरम करो मोदी'! पंतप्रधानांच्या निषेधार्थ राज्यभरात कॉंग्रेस उद्यापासून रस्त्यावर उतरणार : नाना पटोले

Last Updated : Feb 8, 2022, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details