मुंबई -प्रसिद्ध मूर्तिकार बाबी बांदेकर यांचे 2015 साली निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या 5 मुलींनी मूर्ती घडवण्याचा त्यांच्या वारसा पुढे सुरू ठेवला आहे. त्यांनी चेंबूर अमरमहाल येथील गणेश चित्र मंदिर मूर्तिशाळेचे सूत्र हातात घेत अविरतपणे काम सुरू ठेवले आहे. गेल्यावर्षीपासून कोरोना माहामारीमुळे व्यवसाय संकटात आहे, पण यावर्षी बऱ्यापैकी गणेश मूर्तींची मागणी आहे. या मूर्ती मुंबई, महाराष्ट्रासह विदेशातही जात असतात. घर संसार सांभाळून बांदेकर भगिनी हा व्यवसाय सांभाळत आहेत.
हेही वाचा -राज्यातील मंदिरे बंद; मात्र आरोग्य मंदिरे सुरू.. जनता आशीर्वाद देईल, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
गणेश कला मंदिर ही मुंबईतील जुनी मूर्तिशाळा आहे. गेल्या तेरा वर्षांपासून मूर्ती तयार करण्याचे काम या मूर्ती शाळेत सुरू आहे. 53 वर्ष या मूर्तिशाळेला झालेली आहेत. बाबी बांदेकर यांनी मूर्तिकलेने मुंबईकरांना मोहून टाकले होते. त्यांचा समृद्ध वारसा तितक्याच समर्थपणे त्यांच्या पाच मुली चालवत आहेत. त्यांच्याकडून फायबर, प्लास्टर ते निसर्गपूरक कागदी लगदा, शाडूची माती अशा माध्यमातून श्री गणेश आणि देवी मातेच्या मूर्ती घडविल्या जातात. त्याचबरोबर, विविध प्रकारचे डेकोरेटिव्ह मटेरीयल घडवणे वर्षभर अविरत चालू असते. प्रतिभा, विमल, मनीषा, हेमा, तृप्ती अशी या पाच बहिणींची नावे आहेत.