मुंबई -राज्यात शिंदे फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) स्थापन होऊन 19 दिवस झाले आहे. तरीही अजून मंत्रिमंडळ ( Cabinet ) विस्तार झालेला नसल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. त्यातच विविध कामांनी अनेक जण मंत्रालयात ( ministry ) येत असतात व निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतात. ही लोक पाण्याच्या बाटल्यांमधून कीटकनाशक व रॉकेल घेऊन येतात आणि ते प्राशन करण्याचा किंवा अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्नही बऱ्याचदा केला जात असतो. या घटनांना आता चाप लावण्यासाठी मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी ( Ban on water bottles ) आणण्याचा निर्णय घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून भेटली आहे.
आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी बाटली बंद ? -आतापर्यंत मंत्रालयात प्रवेश ( ministry Entry ) करताना सामान्य नागरिकांच्या खिशात तंबाखू व गुटख्याच्या पुड्या आहेत का ? याचा शोध घेतला जात होता. परंतु, आता पाण्याच्या बाटल्यांचाही शोध पोलिसांनी सुरू केला असून पाण्याच्या बाटल्या असल्यास प्रवेशद्वाराजवळ काढून ठेवले जात आहेत. काही दिवसापूर्वी मंत्रालयात येऊन विष प्राशन करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ नये. यामुळे गृह विभागाने पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातल्याची माहिती आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये या विरोधात तीव्र नाराजी उमटत असून मंत्रालयात आत्महत्यांच्या प्रयत्नामध्ये वाढ झाल्याने अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे.