मुंबई - पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police commissioner Sanjay Pandey ) यांनी पदभार घेतल्यानंतर मुंबईकरांसोबत संवाद साधला होता. या संवादात त्यांनी मुंबईकरांना काही समस्या असल्यास मोबाईक क्रमांक सार्वजनिक केला होता. त्यानंतर त्यांना आलेल्या तक्रारीची दखल घेत आयुक्त पांडे यांनी तत्काळ एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे मुंबई शहरात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेर्यंत बांधकामासंबंधीत कामे करण्यास बंदी घातली ( Ban Construction Work ) आहे.
संजय पांडे नागरिकांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजमाध्यमावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तक्रार आणि समस्येकडे ते लक्ष वेधत आहेत. बांधकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी व्यथा फेसबुक लाईव्हमध्ये काही नागरिकांनी मांडली होती. त्यावर संजय पांडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.