महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचे 23 जानेवारीला अनावरण - MAHAVIKAS AGHADI LEADERS WILL BE PRESENT ON

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे येत्या 23 जानेवारीला अनावरण केले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. बाळासाहेबांची येत्या 23 जानेवारी जयंती आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण

By

Published : Jan 19, 2021, 11:01 AM IST

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा मुंबईत उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र हा प्रस्ताव गेले काही वर्ष लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. येत्या 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

बाळासाहेबांच्या पुतळ्याचे 23 जानेवारीला अनावरण

23 जानेवारीला अनावरण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर 2012 ला निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुरातत्व कमिटीने पुतळा उभारण्यास मंजुरी दिली. मात्र मुंबई अर्बन आर्टस् कमिशन यांच्याकडून पुतळा बसवण्यासाठी होकार मिळाला नव्हता. तसेच पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुतळा उभारण्यासाठी सर्व परवानगी मिळाल्याने येत्या 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरण केला जाणार आहे. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील बडे नेते हजेरी लावणार आहेत.

कुठे उभारला जाणार पुतळा
दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र जागा कमी असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर महात्मा गांधी रोड, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे.

कसा असेल पुतळा
बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. बाळासाहेबांची येत्या 23 जानेवारी जयंती आहे. त्याच दिवशी बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुर्णाकृती पुतळा बनवण्याचे काम शिल्पकार शशिकांत वडके यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री क्रिडा संकुलात केले आहे.

हेही वाचा -भीषण अपघात! फुटपाथवर झोपलेल्या 15 मजुरांना ट्रकने चिरडले

ABOUT THE AUTHOR

...view details