महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सर्व काही जुळवून घेण्यासाठी वेळ लागतोय - बाळासाहेब थोरात

अनेक पक्ष एकत्र येणार असतील तर सर्वसमावेशक कार्यक्रम तयार करावा लागतो. ते काम सुरू असून ही जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात

By

Published : Nov 19, 2019, 2:55 PM IST

मुंबई -राज्यात सध्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आमची सर्व जुळवाजुळव सुरू आहे. त्यातून जे होईल ते सर्वसमावेशक कार्यक्रमानुसार होणार आहे. म्हणूनच ही जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत पत्रकारांसोबत बोलताना दिली.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतनिमित्त आज मंगळवारी मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व आदी नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर थोरात यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रीया दिली.

हेही वाचा... शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक संपन्न; काय ठरले याबाबत उत्सुकता

अजूनही सर्वसमावेशक कार्यक्रम बनवून त्याला अंतिम केले, असे काहीही झालेले नाही. मात्र, दिल्लीत ज्या बैठका होतील त्यावरून मार्ग निघेल. काल सोमवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर आम्हाला दिल्लीत लवकर बोलावले जाईल. तसेच पुढचा निर्णय लवकर घेतला जाईल, असे आम्हाला वाटते. मात्र, अद्याप तरी निरोप आला नाही. मात्र कधीही येऊ शकतो, असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा... पवारांचा यू टर्न..? आता म्हणतात ५४ आमदारांवर सरकार कसे बनवणार, सेनेची कोंडी

आमच्या मित्र पक्षांशी बोलण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे सर्व काही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात शरद पवार यांची पत्रकार परिषद आणि काँग्रेसने काढलेले पत्रक लक्षात घेतले तर पुढील काही दिवस चर्चा सुरू राहील, असे वाटते. त्यामुळे दोन पक्ष एकत्र येत आहे. चर्चेला वेळ लागत आहे. मात्र, सर्व काही व्यवस्थित करूनच निर्णय घ्यायचा असतो, असे थोरात यावेळी म्हणाले.

हेही वाचा... आठवलेंनी सुचवला नवा फॉर्म्युला; भाजपला मान्य असल्यास शिवसेनाही तयार

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details