मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार सर्व जण त्रासात आहेत. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते सहा महिने स्थगित करावेत, ही आमची प्रमुख मागणी आहे. रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना दिलेला सल्ला म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली केली.
'रिझर्व्ह बँकेचा सल्ला म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार'
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, देशातील बँकांना कर्जाचे हफ्ते तीन महिने स्थगित करण्याचा सल्ला दिला होता.
हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; 'हा' घेण्यात आला निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, देशातील बँकांना कर्जाचे हफ्ते तीन महिने स्थगित करण्याचा सल्ला दिला होता. यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी, 'रिझर्व्ह बँकेने सल्ला देण्यापेक्षा सर्व बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात. सहा महिने कर्जाचे हफ्ते (ईएमआय) थांबवावेत. हे करताना केंद्र सरकारने बँकांनाही मदत करता येईल याबाबतीत सकारात्मक भूमिका घ्यावी' अशी मागणी थोरात यांनी केली.