मुंबई - राज्यपालांनी नियोजित कार्यक्रम रद्द करून शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारायला थांबणे आवश्यक होते. जनभावनेचा आदर राज्यपालनी करायला पाहिजे, असे मत राज्याचे महसुल मंत्री तसेच काँग्रेचे प्रदेशाद्याक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मुंबईतील शेतकरी आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे शिष्ठमंडळ राज भवनाच्या कडे निघाले होते. राज्यपाल उपास्थित नसल्याने शिष्ठमंडळाने ते निवेदन फाडत आपला संताप व्यक्त केला होता. मात्र, राज्यपाल उपास्थित राहू शकणार नसल्याचे आधीच शिष्ठमंडळाच्या सदस्यांना सांगण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण राजभावणाकडून देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा आदर करत राज्यपालांनी निवेदन स्वीकारायला हवे होते -बाळासाहेब थोरात - शेतकरी आंदोलना बद्दल बातमी
राज्यपालांनी नियोजित कार्यक्रम रद्द करून शेतकर्यांचे निवेदन स्वीकारायला थांबणे आवश्यक होते, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडले. राज्यपाल उपास्थित राहू शकणार नसल्याचे आधीच शिष्ठमंडळाच्या सदस्यांना सांगण्यात आल्याचे स्पष्टीकरण राजभवणाकडून देण्यात आले होते.
शेतकऱ्यांचा आदर करत राज्यपालांनी निवेदन स्वीकारायला हवे होते -बाळासाहेब थोरात
शेतकरी मोर्चात शेतकरी सहित शहरी लोकांचाही सहभाग- थोरात
शेतकरी आंदोलनासाठी भेंडीबाजारातून महिलांना आणण्यात आल्या असल्याचा आरोप भाजप कडून करण्यात आला होता. मात्र, केंद्राने केलेले कृषिकायदे हे केवळ शेतकरीच नाही तर सामान्य माणसाच्या विरोधात असल्याने सामान्य माणूसही या कायद्यांचा विरोध करत आल्याचे मत बाळासाहेब थोरात यांनी युक्त केले आहे.