मुंबई -राज्यात ओल्या दुष्काळामुळे एकूणच परस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळायला हवी, म्हणून आम्हीही राज्यपालांकडे मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघातील दुष्काळाचा आढावा घेत मदत करावी, अशा सूचना केल्या असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबईत दिली.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज काँग्रेसकडून विधानभवन परिसरात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर थोरात यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. थोरात म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.