महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 13, 2019, 5:04 PM IST

ETV Bharat / city

'आमची भेट झाली हिच मोठी सकारात्मक बाब'

काँग्रेस शिवसेना नेत्यांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये बैठक संपन्न, बैठकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा.. आम्ही भेटलो आहोत हेच सकारात्मक असल्याचे बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य..

बाळासाहेब थोरात

मुंबई -काँग्रेस आणि शिवसेने नेत्यांची आज वांद्र्यातील हॉटेल ट्रायडेंटमध्ये येथे बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तसेच आजची उद्धव ठाकरे यांची भेट ही सदिच्छा होती आणि आम्ही भेटलो आहोत, हेच सकारात्मक असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

हेही वाचा... शिवसेनेसोबत चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रत्येकी पाच नेत्यांची समिती गठीत

काही मुद्यांवर चर्चा होणे गरजेचे म्हणून भेट

सत्ता स्थापन करण्यापूर्वी काही मुद्यांवर चर्चा होणे गरजेचे म्हणून भेट घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करू, असेही थोरात म्हणाले. राष्ट्रवादीने कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी समिती तयार केली आहे. आम्ही ही लवकर तयार करू असे थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा... 'भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट घेतला, आता 'नीळकंठ' होण्यास तयार'

शिवसेना आणि काँग्रेस दरम्यानच्या या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते सुभाष देसाई तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details