मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तूर्तास बाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार आहेत. यासाठी आज काँग्रेसचे राज्य प्रभारी एच.के. पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या संदर्भात मंत्री आणि काँग्रेसच्या आमदारांचा कल जाणून घेतला. त्यात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनी बाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून योग्य असल्याचे मत व्यक्त केल्याने तुर्तास काही महिने तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद हेही वाचा - IND vs AUS : टीम इंडियाची घोषणा; रोहितचे पुनरागमन, नवदीप सैनीचे पदार्पण
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद बदलले जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठांशी आपल्याकडील एक पद कमी करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद हे बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान क्रीडा मंत्री सुनील केदार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राजीव सातव आदींच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र आज काँग्रेसच्या राज्य प्रभारी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा कल लक्षात घेता घेतला यातून मंत्र्यांची सर्वाधिक पसंती ही बाळासाहेब थोरात यांच्या नावाला असल्याचे समोर आले. यामुळे तूर्तास बाळासाहेब थोरात यांचे प्रदेशाध्यक्षपद अबाधित राहण्याची शक्यता आहे.
थोरातांना कायम ठेवण्याची भूमिका
प्रभारी एच. के. पाटील यांनी काँग्रेस नेत्यांसमवेत सह्याद्री अतिथिगृहात बैठक घेतली. यात मंगळवारी रात्री सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. तर, बुधवारी सकाळी मंत्री अशोक चव्हाण आणि इतर मंत्र्यासोबत बैठक घेतली. यानंतर पाटील यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष, कॅबिनेट, राज्यमंत्री मंत्री व आमदारांशी नेतृत्त्वबदलाबाबत चर्चा केली. यात बहुतांशांनी थोरातांना कायम ठेवण्याची भूमिका मांडली. शिवाय थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आल्यानंतर राज्यात काँग्रेसची स्थिती सुधारत असल्याचे मतही या वेळी अनेक मंत्र्यांनी प्रभारी पुढे व्यक्त केले. शिवाय मागील पाच वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसली जात आहे. काँग्रेसचा जनाधारसुद्धा वाढत असल्याचे या मंत्र्यांनी राज्य प्रभारी पाटील यांच्याकडे सांगितले.
''पक्षाचे नेतृत्त्व बदलणे फारसे लाभदायक ठरणार नाही''
पुढील दोन- तीन महिन्यांत ५ महापालिका व १०० नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. शिवाय वर्षभरावर राज्यातील प्रमुख १५ महानगरपालिकांसह २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ठेऊन ठेपल्या आहेत. अशा वेळी पक्षाचे नेतृत्त्व बदलणे फारसे लाभदायक ठरणार नाही. असे परखड मत राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य प्रभारींकडे व्यक्त केले. दरम्यान या संदर्भात विचारले असता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात होती प्रदेशाध्यक्षपदाच्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, असा दावा केला आहे.