मुंबईविविध राज्य महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे.असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात Former Minister Balasaheb Thorat यांनी आज सभागृहात व्यक्त केले. नाशिकहून मुंबईचा प्रवास Nashik Mumbai Travel हा फक्त ३ तासांचा आहे, परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे State Government महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे का असा सवाल थोरात यांनी विचारला आहे.
त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो दिवंगत आमदार विनायक मेटे Late MLA Vinayak Mete यांच्या अपघाती मृत्यूवरील चर्चेत भाग घेत थोरात यांनी खराब महामार्ग व त्यावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास याबद्दल आज विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर बेशिस्त वाहतूक पहावयास मिळते, लेनसी शिस्त पाळली जात नाही. आपण सुरक्षित वाहन चालवत असलो तरी समोरचा त्याच पद्धतीने शिस्तबद्ध वाहन चालवत असेलच असे नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. यावर सरकारकडे काही ठोस धोरण असले पाहिजे. जनजागृती, प्रशिक्षण याबरोबरच रस्ते व्यवस्थेत असले पाहिजेत हेही तितकेच महत्वाचे आहे. असे मत थोरात यांनी मांडले. महामार्गावरील खड्डे बुजवले पाहिजेत. नाशिक मुंबई महामार्गाचे उदाहरण पाहता या रस्त्यांवरून वाहन चालवताना टायर फुटतात, अत्यंत निकृष्ट रस्ता आहे. त्यामुळे ३ तासांच्या प्रवासाला ६ तास लागतात. प्रवासही जीव मुठीत घेऊन करावा लागतो. या महामार्गावरचे टोल वसुल केले जातात पण रस्त्यांच्या दर्जाबद्दल, त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. राज्य सरकारने या प्रश्नात लक्ष घालावे व एक निश्चित धोरण आहे का ते सांगावे असे थोरात म्हणाले.