मुंबई - येत्या 23 जानेवारीला मनसेचे पहिले महाअधिवेशन गोरेगावात पार पडणार आहे. याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून, शिवसेनादेखील वांद्रे येथील बीकेसी मैदानात कार्यक्रम घेणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे 'वचनपूर्ती जल्लोष मेळावा' या ठिकाणी साजरा होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री व शिवसेना नते अनिल परब यांनी दिली.
कॅबिनेट मंत्री व शिवसेना नते अनिल परब यांची प्रतिक्रीया हेही वाचा - ...चक्क साहित्य संमेलनातच बनावट पुस्तकांची विक्री!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दोन्ही ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेना आणि मनसे आपलं शक्तीप्रदर्शन करताना पाहायला मिळणार आहे.
मनसेच्या गोरेगावातील नेस्को येथे पार पडणाऱ्या महाअधिवेशनात 18 हजार मनसेचे राज्यभरातील शाखाप्रमुख सकाळपासून हजेरी लावणार आहे. तर संध्याकाळी राज ठाकरे आगामी पक्षाची भूमिका आपल्या भाषणातून जाहीर करतील, अशी चर्चा आहे. यामुळे मनसेच्या महाअधिवेशनाकडे सर्वांचे लक्षे लागून आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात होणाऱ्या सत्कार सभेला 50 हजारांहून अधीक शिवसैनिक तसेच देशातील नामवंत राजकीय नेते, उद्योजक, कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती परब यांनी दिली.
हेही वाचा - जळगावात भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा राडा; दानवे, महाजनांवर फेकली शाई