महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रणगाड्यातून निघाली आंबामातेची मिरवणूक; बाळ गोपाळ मित्र मंडळाचा उपक्रम - बाळ गोपाळ मित्र मंडळ

प्रभादेवी येथील बाळ गोपाळ मित्र मंडळांची रणगाड्यातून निघालेली मिरवणुकीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देवीच्या मिरवणुकीत व्यक्त केलेल्या देशभक्तीनंतर मंडळावर कौतुकाचे वर्षाव होत आहे.

बाळ गोपाळ मित्र मंडळाचा उपक्रम

By

Published : Oct 10, 2019, 3:42 AM IST

मुंबई- नऊ दिवस मनोभावे पूजा करत देवीला निरोप देण्यात आला. मात्र यावेळी प्रभादेवी येथील बाळ गोपाळ मित्र मंडळांची रणगाड्यातून निघालेली मिरवणुकीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देवीच्या मिरवणुकीत व्यक्त केलेल्या देशभक्तीनंतर मंडळावर कौतुकाचे वर्षाव होत आहे. 1988 सालापासून बाल गोपाळ मित्र मंडळाकडून देवीची स्थापना करण्यात येत आहे. दरवर्षी मंडळाकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येते. मागील वर्षी देखील हातगाडीला सजवत महत्त्व दाखवण्यात आले होते.

रणगाड्यातून निघाली आंबेमातेची मिरवणूक

मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संदेश देत आहे. यावेळी आम्ही चांद्रयान 2 चा देखावा साकारला होता. तसेच भारतीय सेनेचा अभिमान हा प्रत्येक भारतीयाला आहे म्हणून आम्ही यावेळी रणगाड्यातून आंबेमातेची मिरवणूक काढण्याचे ठरवले, असे या मंडळाच्या कार्यकर्त्यानी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details